”ज्यांना मतदान करायचे नाही ते…”असंही गडकरींनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
वाशिम : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथे ३,६९५ कोटी रुपयांच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबतही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत मी कोणाला चहाही देणार नाही, ज्यांना मतदान करायचे आहे ते नक्कीच करतील. Gadkaris statement in the background of the Lok Sabha elections Neither will I put up a banner nor will I give tea
नितीन गडकरी म्हणाले, “या लोकसभा निवडणुकीसाठी मी ठरवले आहे की कोणतेही बॅनर, पोस्टर लावले जाणार नाही आणि लोकांना चहा दिला जाणार नाही. ज्यांना मतदान करायचे आहे ते मतदान करतील आणि ज्यांना मतदान करायचे नाही ते मतदान करणार नाही. मी लाच घेणार नाही आणि कोणाला देऊ देणार नाही.”
Pakistan Bomb Blast : बॉम्बस्फोटांनी हादरले पाकिस्तान, काही तासांतच दोन आत्मघातकी हल्ल्यात ६० ठार
आपल्या स्पष्टवक्तेपणा बद्दल सर्वपरिचित आहेत, आता त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत.
Gadkaris statement in the background of the Lok Sabha elections Neither will I put up a banner nor will I give tea
महत्वाच्या बातम्या
- कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा तापला, आज शेतकऱ्यांची कर्नाटक बंदची हाक; 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी संघटनांचा पाठिंबा
- Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक सुवर्ण, पुरुष संघाने केला विश्वविक्रम
- इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 : भारतीय लोकसंख्येची झपाट्याने वृद्धत्वाकडे वाटचाल, शतकाअखेरीस 36 टक्के राहील प्रमाण
- राहुल गांधींची फर्निचर मार्केटला भेट; लाकूड कापून खुर्ची बनवायला शिकले; मजुरांच्या समस्या घेतल्या