विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आजारी असल्यामुळे गैरहजर पण अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बैठकीला दांडी मारली. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या राज्यांसोबत बैठका सुरू आहेत.Fwd: Chief Minister and even Finance Minister Ajit Pawar absent, Finance Ministry meeting with states on the background of budget
केंद्रीय अर्थसंकल्प पुढच्या महिन्यात १ फेब्रुवारीला मांडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. ठाकरे आणि पवार दोघेही बैठकांना उपस्थित राहत नसल्याने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारला राज्याच्या भल्याची काहीही पडलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या अर्थमंत्र्यासोबत दोन वेळा बैठक बोलावली. पण मुख्यमंत्री तर सोडाच राज्याचे अर्थमंत्री दोन्ही बैठकांना उपस्थित नव्हते, असं म्हणत डॉ. केंद्रीय अर्थराज्य मंत्री कराड यांनी महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीमुळे किंवा कामातील व्यग्रतेमुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नसतील, हे आपण समजू शकतो. पण केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बोलावलेल्या बैठकांना राज्याचे अर्थमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहू शकत नाहीत? असा सवाल डॉ. कराड यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींने बैठकीत उपस्थिती लावली असती तर हे राज्यासाठी फायद्याचंच ठरले असते, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी स्पष्ट केल.केंद्रीय अर्थमंत्रालयाने बोलावलेल्या बैठकीला अनेक राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री मनिष सिसोदिया, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते.
Fwd: Chief Minister and even Finance Minister Ajit Pawar absent, Finance Ministry meeting with states on the background of budget
महत्त्वाच्या बातम्या
- प्राप्तिकरातून साखर कारखान्यांची सुटका, केंद्रीय सहकार मंत्र्यांचा निर्णय ; एफआरपीपेक्षा उसाला दिलेला जादा दर आता नफा म्हणून गृहीत धरला जाणार नाही
- डोकं फिरलंया, नानाचं डोक फिरलंया, पंतप्रधानांता ताफा अडविण्यामागे अमित शहा यांचा हात असल्याची पटोलेंना शंका
- पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चूक अक्षम्य, देशातील २७ माजी पोलीस महासंचालकांनी लिहिले राष्ट्रपतींना पत्र
- PUNJAB HIGH COURT : उच्च न्यायालयाला पंजाबची चिंता सरकारला पंतप्रधानांचा दौरा सांभाळता आला नाही-डेरा प्रमुखाला आणलं तर परिस्थिती कशी हाताळणार?