• Download App
    सत्तासंघर्षावरील ‘सर्वोच्च’ निकालावर मुख्यमंत्री शिंदे, उद्धव ठाकरेंपासून ते शरद पवार कोश्यारींपर्यंत, जाणून घ्या कोण काय म्हणाले? From Chief Minister Shinde Uddhav Thackeray to Sharad Pawar Koshyari reacts to the supreme verdict on the power struggle

    सत्तासंघर्षावरील ‘सर्वोच्च’ निकालावर मुख्यमंत्री शिंदे, उद्धव ठाकरेंपासून ते शरद पवार कोश्यारींपर्यंत, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

    शहाजी बापू पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे टोला, तर अजित पवारांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च  न्यायालयाच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय अस्थिरता संपून शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले आहे, इतकेच नाही तर आत्तापर्यंत घटनाबाह्य सरकारचा ठपका लावणाऱ्या उद्धव ठाकरेंना या निकालातून चपराकही बसली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच राजीनामा देऊन पवारांच्या सरकार घालवले हे देखील न्यायालयाच्या आदेशातूनच स्पष्ट झाले आहे. यावरून  आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पाहूयात कोण काय म्हणालं? From Chief Minister Shinde Uddhav Thackeray to Sharad Pawar Koshyari reacts to the supreme verdict on the power struggle

    उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युतीला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय योग्यच होता. असं सर्वोच्च  न्यायालयाने निकाल देताना म्हटलं. या निर्णयाचे बाळासाहेब भवनाच्या बाहेर शिवसैनिकांनी जल्लोष करत स्वागत केले. तर दुसरीकडे ‘’निवडणूक आयोग ब्रह्मदेव नाही, राज्यपालही ब्रह्मदेव नाही.” असं म्हणत शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

    शरद पवार काय म्हणतात? –

    तसेच, ‘’सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना १६ आमदारांबाबत निर्णय घेण्यासाठी कुठलीही कालमर्यादा घातली नाही. असे सांगत, विरोधी आघाडीचा चेहरा नंतर ठरवू, आधी एकत्र या. भाजपा विरोधकांना एकत्र काम करण्याची गरज आहे.”  असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. कारण, ‘’शरद पवार हे विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद आहे.” असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी म्हटलेलं आहे.

    लवकरच मंत्रिमंडळ  विस्तार होणार  –

    मात्र यावर ‘’नितीश कुमार येवो किंवा कुणीही येवो. युती महाराष्ट्रात मजबूत आहे आणि पूर्ण बहुमताने जिंकून येईल.” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे. याशिवाय ‘’भरत गोगावलेंना पुन्हा व्हीप नेमण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरु करणार.”  असल्याची खासदार राहुल शेवाळे शेवाळेंची माहिती दिली आहे.

    …त्यामुळे सरकार अजूनही टांगणीवर आहे – नरहरी झिरवळ

    ‘’उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा त्यांचा विचार झाला असता असं सांगितलं जातं. परंतु राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर न्यायालयानं ताशेरे ओढलेत. तसंच १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे, त्यावर चर्चा होईल. १६ अपात्र झाले तर त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. त्यामुळे सरकार अजूनही टांगणीवर आहे असं म्हणायला हरकत नाही.” असा युक्तीवाद नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया देताना केला.

    अजित पवारांचा बोलण्यास नकार  –

    याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवारांनी  मात्र  निकालावर बोलण्यास नकार दिला. “मी निकाल बघितलेला नाही. जोपर्यंत व्यवस्थित निर्णय बघत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही.” असं त्यांनी सांगितलं.

    ‘’शिंदे सरकार वाचलं असलं तरी त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली असून, ‘’भाजपा लोकशाहीसाठी घातक, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते हे पुन्हा सिद्ध.”  अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. याचबरोबर ‘’सत्तांतराच्या बाबत दिलेला निर्णय खूप विचार करायला लावणारा आहे. देशातील संपूर्णपणे राजकारणावर त्याचा प्रभाव राहणार आहे. सरकार तोडण्यासाठी केलेले प्रयत्न हे बेकायदेशीर होते हे स्पष्ट करणारा तो निर्णय आहे.” अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी  प्रतिक्रिया दिली आहे. ‘’माझं मत असं आहे की, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत हा निर्णय चुकीचा दिला आहे.”  असं मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले आहेत.

    भगतसिंह कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया –

    “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणीवर आपण करू शकत नाही. बहुमत चाचणीचा निर्णय तेव्हा चुकीचा होता. आता त्याच्याशी काय करायचंय?. यासंदर्भात न्यायालयानं सगळं सांगितलं आहे. न्यायालयाच्या निकालापुढे मला काहीही बोलायचं नाही.” असं कोश्यारींनी म्हटलं आहे.

    राऊतांनी गुवाहाटीच्या आता गुवाहाटीच्या जंगलात जावे –

    ‘’जो अपेक्षित निर्णय होता तोच निर्णय कोर्टाने दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी उठावानंतर जी काही कागदपत्र करायला पाहिजे होती, ती मजबुतीने तयार केली होती.” अशा शब्दांत आमदार बच्चू कडूंनी प्रतिक्रिया व्यक्त केली.  तर ‘’संजय राऊतांनी गुवाहाटीच्या जंगलात जावे.’’ असा टोला आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.

    From Chief Minister Shinde Uddhav Thackeray to Sharad Pawar Koshyari reacts to the supreme verdict on the power struggle

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस