• Download App
    Fraudster Ashok Kharat's wife absconding; Police issues lookout notice भोंदू बाबा अशोक खरातची बायको फरारी; पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी

    भोंदू बाबा अशोक खरातची बायको फरारी; पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी

    ashok kharat

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात गुन्ह्यांची मालिका सुरू असताना अनेक पीडित महिला समोर येत असून केवळ शोषणच नव्हे तर फसवणूक आणि आर्थिक गैव्यवहाराबाबत देखील तक्रारी नोंदवत आहेत. या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. अशोक खरात सावकारकीचा व्यवसाय देखील करत असल्याचे उघड झाले असून त्यामध्ये त्याची पत्नी कल्पना ही देखील सामील असल्याचे समोर आले.Fraudster Ashok Kharat’s wife absconding; Police issues lookout notice

    त्यामुळे पोलिसांनी तिच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होताच कल्पना खरात फरार झाली. कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शिर्डी पोलिसांनी तिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. या नोटिसीमुळे देशातील सर्व विमानतळांवर तिच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली असून नाकेबंदी करण्यात आली आहे. पोलिसांकडून सध्या तिचा शोध सुरू आहे.



    – अशोक खरात पण पळायच्या तयारीत होता

    विशेष म्हणजे, यापूर्वी अशोक खरात देखील परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला अटक केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता कल्पना खरातलाही देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. शिर्डीतील 4 एकर भूखंडाच्या खरेदी-विक्री प्रकरणात देखील मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. या प्रकरणी मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांनी तक्रार दाखल केली आहे. कर्ज देण्याच्या बहाण्याने सावकारीच्या जाळ्यात अडकवून जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    – 5 जणांवर गुन्हा दाखल

    या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी अशोक खरात, कल्पना खरात यांच्यासह अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे या 5 जणांविरुद्ध फसवणूक आणि सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे आधीच खळबळ उडालेली असताना, आता आर्थिक फसवणुकीचेही धक्कादायक तपशील समोर येत असल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. पोलिस तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Fraudster Ashok Kharat’s wife absconding; Police issues lookout notice

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मतदार पडताळणीच्या मुद्द्यावर दोन मुस्लिम पक्ष मालेगाव महापालिकेत एकमेकांना भिडले, प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचले!!

    प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या समर्थनात पार्थ पवारचे पहिल्यांदाच ट्विट; रोहित पवार सह पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना धक्का!!

    राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे 50 आमदार भाजपमध्ये जाणार!!; संजय राऊतांचा इशारा, की वातावरण निर्मिती??