विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनामुळे कारविक्रीच्या गतीला चांगलाच ब्रेक लागला आहे. अनेक राज्यांनी लावलेल्या लॉकडाऊनचा मोठा परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे. बड्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या वाहनविक्रीमध्ये एप्रिल महिन्यात चांगलीच घट झाली. Four wheller market down due to corona second wave
गेल्या वर्षी कोरोना संसर्गाचा वाहन विक्रीवर मोठा परिणाम झाला होता; मात्र नंतर कंपन्यांनी हळूहळू पिकअप घेतला होता. कोव्हिड संसर्गाच्या भीतीने अनेकांनी खासगी वाहनांना प्राधान्य दिले. त्यामुळे कार खरेदीला वेग आला.
अगदी यंदाच्या मार्चपर्यंत तो कायम होता; मात्र एप्रिलमध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेक राज्यांनी लावलेल्या लॉकडाऊनमुळे वाहनांची वाहतूक करण्यातही अडचणी निर्माण झाल्या. या सर्वांचा एकंदरीत परिणाम वाहन विक्रीवर झाला.
देशातील सर्वांत मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने एप्रिलमध्ये १,५९,६९१ कारची विक्री नोंदवली. त्यापैकी देशात १,३५,८७९ कार विकण्यात आल्या. पाच महिन्यांतील मारुतीने नोंदवलेली ही सर्वांत कमी वाहन विक्री आहे.
टोयोटा किर्लोस्करची वाहनविक्रीही ५,३७९ ने कमी झाली आहे. एमजी मोटर्सची वाहनविक्रीही अर्ध्यावर आली आहे. केवळ महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने वाहनविक्रीत सातत्य ठेवले आहे. हुंडाई मोटरने एप्रिल महिन्यात ४९,००२ कारविक्रीची नोंद केली आहे. चार महिन्यांतील त्यांचा वाहनविक्रीचा हा नीचांक आहे. देशातील तिसरी बडी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या वाहनविक्रीत साडेचार हजारांनी घट झाली आहे.
Four wheller market down due to corona second wave
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोग बरखास्त करा अन नियुक्ती पात्रतेचे निकष ठरवा, कॉंग्रेसची मागणी
- जमीन हडप केल्याप्रकरणी तेलंगणमध्ये आरोग्य मंत्र्याची हकालपट्टी!
- बंगालमध्ये भाजप उमेदवार गोवर्धन दास यांच्या घरावर तृणमूलच्या गुंडांचा बॉम्बहल्ला, गृहमंत्री अमित शाहांनी पाठवली मदत
- लसीकरणाचे सध्याचे धोरण लोकांच्या आरोग्याला हानीकारक, फेरआढावा घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश