गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून लोकसभा खासदार आहे. तो लखनऊ सुपरजायंट्स या नवीन आयपीएल संघाचा मार्गदर्शक देखील आहे. Former Team India opener Gautam Gambhir has been asked to test for corona infection
विशेष प्रतिनिधी
मुंबई : टीम इंडियाचा माजी सलामीवीर तसेच भाजप नेता गौतम गंभीरला कोरोनाची लागण झाली आहे.गंभीरने स्वतःला क्वारंटाईन केले आहे.त्याने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
गंभीरने ट्विटरवर सांगितले की , “मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने चाचाणी केली.सौम्य लक्षणे आढळल्यानंतर मी कोरोना चाचाणी केली.दरम्यान माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.तसेच जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांची चाचणी करून घ्या आणि सुरक्षित रहा.असे ट्विट गंभीरने केले आहे.
- Sharad Pawar : शरद पवार यांना कोरोनाची लागण, देशभरातील दिग्गज नेत्यांकडून लवकर बरे होण्याची सदिच्छा!
2018 मध्ये गौतम गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गंभीरने भारतासाठी 54 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामने खेळले. तसेच 2007 आणि 2011 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता. विशेष म्हणजे गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून लोकसभा खासदार आहे.तो लखनऊ सुपरजायंट्स या नवीन आयपीएल संघाचा मार्गदर्शक देखील आहे.