• Download App
    साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेला मरण करणाऱ्या माजी सरपंचाला पत्नीसह अटक । Former Sarpanch arrested for killing pregnant forest ranger in Satara

    साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेला मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला पत्नीसह अटक

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : साताऱ्यात एका गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सिंधू सानप असं वनरक्षक महिला कर्मचाऱ्याचं नाव असून, रामचंद्र जानकर असं मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाचं नाव आहे. पोलिसांनी आता रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे. Former Sarpanch arrested for killing pregnant forest ranger in Satara

    रामचंद्र जाणकर महिलेला मारहाण करण्याचा व्हिडीओ समोर आला असून, या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.



    या घटनेची दखल राज्य महिला आयोगाने घेतली त्यानंतर सातारा पोलिसांनी कारवाई करत रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नीला अटक केली. संबंधित वनरक्षक महिलेच्या गर्भाला काही इजा पोहोचली आहे का यासंदर्भात वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि त्यानुसार रामचंद्र जानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक सुनील बन्सल यांनी पत्रकारांना सांगितले. सकृद्दर्शनी महिलेच्या गर्भास इजा झाली नसल्याचे दिसत आहे आहे परंतु वैद्यकीय तपासणी करून त्याची खातरजमा केली जाईल, असेही ते म्हणाले.

    Former Sarpanch arrested for killing pregnant forest ranger in Satara

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजित पवारांचा आज दिवसभर कार्यक्रम काय होता??; बारामती तालुक्यात ते कुठे कुठे घेणार होते सभा??

    Ajit Pawar exit : एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भावना!!

    Ajit Pawar exit : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे सोडून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित होईल??