• Download App
    Sangeeta Thombare Joins Shiv Sena Shinde Group: Blow to NCP Sharad Pawar in Beed बीडमध्ये शरद पवार गटाला धक्का; माजी आमदार संगीता ठोंबरेंचा शिवसेनेत प्रवेश, केज मतदारसंघात शिंदे गटाची ताकद वाढणार

    Sangeeta Thombare : बीडमध्ये शरद पवार गटाला धक्का; माजी आमदार संगीता ठोंबरेंचा शिवसेनेत प्रवेश, केज मतदारसंघात शिंदे गटाची ताकद वाढणार

    Sangeeta Thombare

    विशेष प्रतिनिधी

    बीड : Sangeeta Thombare  जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच आता बीडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. संगीता ठोंबरे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे. तसेच संगीता ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशाने बीडमध्ये शिंदे गटाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.Sangeeta Thombare

    संगीता ठोंबरे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीने शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी संगीता ठोंबरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याची चर्चा सुरू आहे. संगीता ठोंबरे या एकेकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानल्या जात होत्या. केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी देण्याऐवजी नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे संगीता ठोंबरे नाराज झाल्या होत्या.Sangeeta Thombare



    2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिल्यानंतर संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत त्यांनी शरद पवार गटात अधिकृत प्रवेश केला होता, ज्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे मानले जात होते.

    मात्र, आता संगीता ठोंबरे यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळात त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला केज मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. ठोंबरे यांच्या या सत्तेतील पक्षासोबतच्या प्रवेशामुळे मतदारसंघातील राजकीय गणिते पुन्हा एकदा बदलली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा कोणाला फायदा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Sangeeta Thombare Joins Shiv Sena Shinde Group: Blow to NCP Sharad Pawar in Beed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगे भाजपच्या वाटेवर! चंद्रकांत पाटील म्हणाले- आता पक्षप्रवेशाची फक्त टेक्निकल बाब राहिलेली

    Eknath Shinde : शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, हॉटेलमधील नगरसेवकांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा

    Narayan Rane : उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत:त्यांच्या बोलण्यात वास्तव नाही, महापौर पदाच्या विधानावरुन नारायण राणेंची टीका