• Download App
    फेसबुक लाइव्ह सुरू असताना माजी आमदार घोसाळकरांच्या मुलावर मुंबईत गोळीबार, आरोपीचीही आत्महत्या|Former MLA Ghosalkar's son shot dead in Mumbai while Facebook live was going on, accused also committed suicide

    फेसबुक लाइव्ह सुरू असताना माजी आमदार घोसाळकरांच्या मुलावर मुंबईत गोळीबार, आरोपीचीही आत्महत्या

    वृत्तसंस्था

    मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र व दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गुरुवारी फेसबुक लाइव्ह सुरू असताना गोळ्या घालून खून करण्यात आला. त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर गुंड मॉरिसभाईने स्वत:वरही गोळीबार करून घेतला. गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. राजकीय वैमनस्य व पैशाच्या वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.Former MLA Ghosalkar’s son shot dead in Mumbai while Facebook live was going on, accused also committed suicide



    अभिषेक हे पश्चिम उपनगरातील प्रभाग १ चे (दहिसर आणि बोरिवली पश्चिम) नगरसेवक होते. नंतर त्यांच्या पत्नीही त्याच जागेवरून निवडून आल्या. अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर हे दहिसरचे माजी आमदार आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते मानले जातात. एमएचबी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिस नावाच्या व्यक्तीने अभिषेक यांच्यावर ३ राउंड गोळीबार केला. बोरिवली (पश्चिम) येथील आयसी कॉलनी परिसरात रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मॉरिसने स्वत:वरही चार गोळ्या झाडून घेतल्या होत्या. गंभीर अवस्थेत दोघांना जवळच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण दोघांनाही वाचवता आले नाही.

    कोण आहे मॉरिसभाई?

    अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याचे परदेशात काही ठिकाणी कॅसिनो चालत असल्याचीही दहिसर परिसरात चर्चा होती. बलात्कार, खंडणी, फसवणुकीचेही काही गुन्हे त्याच्यावर आहेत. अवैध धंद्यातून अमाप पैसे कमावणाऱ्या मॉरिसने कोरोनाकाळात दहिसरमधील वॉर्ड १ आणि ७ मध्ये रेशन किट, औषधांचे मोठ्या प्रमाणावर वाटप केले. याबद्दल त्याला पुरस्कारही मिळाला होता. काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात त्याची उठबस वाढली होती.

    अभिषेकच्या वॉर्डातून मॉरिसला निवडणूक लढवायची होती. याच कारणावरून वर्षभरापूर्वी या दोघात वाद झाला होता. यानंतर बलात्कार प्रकरणात मॉरिसला अटक झाली. अभिषेकने खोट्या तक्रारीवरून अडकवल्याचा संशय होता. हेही खुनाचे कारण असू शकते.

    Former MLA Ghosalkar’s son shot dead in Mumbai while Facebook live was going on, accused also committed suicide

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा

    म्हणे, शिंदे + अजितदादा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; पण यात संजय राऊतांनी कोणता मोठ्ठा “जावईशोध” लावला??