• Download App
    माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागणFormer minister Girish Mahajan infected with corona

    माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण

    महाजन हे गेल्या दोन दिवसांपासून मतदार संघात दौरे करत आहे. आज शनिवारी ( 8 जानेवारी ) त्यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजनही पार पडणार होते.Former minister Girish Mahajan infected with corona


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून राजकीय नेते एकापाठोपाठ कोरोना बाधित होताना पाहायला मिळतं आहे. अशातच भाजपचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन आता पॉझिटिव्ह आले आहेत.



    गिरीश महाजन यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन महाजन यांनी केले आहे.

    महाजन हे गेल्या दोन दिवसांपासून मतदार संघात दौरे करत आहे. आज शनिवारी ( 8 जानेवारी ) त्यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजनही पार पडणार होते. मात्र, त्यापुर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

    Former minister Girish Mahajan infected with corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!