Tuesday, 6 May 2025
  • Download App
    ड्रग्ज प्रकरणावर फडणवीस म्हणाले, पंचांची विश्वासार्हता संपायला नको, अधिकाऱ्यांना धमकावणे चूक, आरोपांची एनसीबीने चौकशी करावी!|former CM Devendra Fadnavis Press In Dadara Nagar Haveli Says credibility of Witness should not end, it is wrong to threaten the officials, NCB Should Investigate allegations

    ड्रग्ज प्रकरणावर फडणवीस म्हणाले, पंचांची विश्वासार्हता संपायला नको, अधिकाऱ्यांना धमकावणे चूक, आरोपांची एनसीबीने चौकशी करावी!

    मुंबईतील बहुचर्चित क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खानच्या अटकेची देशभरात चर्चा सुरू आहे. याप्रकरणी एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्यासारख्या गंभीर आरोपांचा यात समावेश आहे. यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दादरा नगर हवेलीत बोलताना ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. पंचांची विश्वासार्हता संपायला नको.former CM Devendra Fadnavis Press In Dadara Nagar Haveli Says credibility of Witness should not end, it is wrong to threaten the officials, NCB Should Investigate allegations


    प्रतिनिधी

    दादरा नगर हवेली : मुंबईतील बहुचर्चित क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खानच्या अटकेची देशभरात चर्चा सुरू आहे. याप्रकरणी एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

    खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्यासारख्या गंभीर आरोपांचा यात समावेश आहे. यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दादरा नगर हवेलीत बोलताना ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. पंचांची विश्वासार्हता संपायला नको.

    फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. जे साक्षीदार आहेत त्यांची विश्वासार्हता संपेल. अशी कारवाई झाल्यास साक्ष द्यायला पुढे कुणी येणार नाही. पण मी मानतो की काही आरोप झाले आहेत तर एनसीबीने त्यांची चौकशी करावी.

    दरम्यान, दादरा नगर हवेलीतील निवडणुकीच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधिसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत.

    मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, अशी कडाडून टीकाही त्यांनी केली.

    former CM Devendra Fadnavis Press In Dadara Nagar Haveli Says credibility of Witness should not end, it is wrong to threaten the officials, NCB Should Investigate allegations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस

    Icon News Hub