प्रतिनिधी
पुणे : सहकार अपील न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष तुकाराम आप्पाराव हरे यांचे दि. १५ फेब्रुवारी रोजी वार्धक्याने निधन झाले. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर हॅास्पिटल मध्ये त्यांना दाखल केले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ॲड. शेखर व ॲड. राहूल, सुना व नातवंडे आहेत. Former Chairman of Co-operative Appeal Tribunal Tukaram Hare passes away
त्यांनी सहकार न्यायाधीश म्हणून सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे येथे काम पाहिले. त्याचप्रमाणे ते महाराष्ट्र राज्य सहकार अपील न्यायाधिकरणाचे सदस्य व अध्यक्ष होते. त्यांचे मूळ गाव अंबेजोगाई तालुक्यातील जवळगाव हे होते. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात गाजलेले अनेक निकाल त्यांनी दिले होते.
Former Chairman of Co-operative Appeal Tribunal Tukaram Hare passes away
महत्त्वाच्या बातम्या