विशेष प्रतिनिधी
नागपूर :Ganesh Naik गेल्या सहा महिन्यांत पुणे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक भागांत बिबट्याने धुमाकूळ घालत ३७ जणांचा बळी घेतला. या बिबट्यांना मानवी वसाहतीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी बिबट्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात जंगलात १ कोटी रुपये किमतीच्या शेळ्या-मेंढ्या सोडा, असे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी वन अधिकाऱ्यांना दिले आहेत.Ganesh Naik
राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, “जर बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारला भरपाई म्हणून १ कोटी रुपये द्यावे लागतील. म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगितले की, मृत्यूनंतर भरपाई देण्याऐवजी १ कोटी रुपयांच्या शेळ्या जंगलात सोडा, जेणेकरून बिबटे मानवी वस्तीत येऊ नयेत. बिबट्यांचा मोठा अधिवास, धोका असलेल्या भागात हा निर्णय लागू होईल. पूर्वी बिबट्याला वन्यप्राणी म्हटले जात होते. परंतु आता त्यांचा अधिवास उसाच्या शेतात वाढला आहे.Ganesh Naik
निर्बीजीकरणासाठी तीन वर्षे
नाईक असेही म्हणाले की, मादी बिबट्या चार पिल्लांना जन्म देत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्र सरकारने राज्य वन विभागाला प्रायोगिक तत्त्वावर फक्त पाच बिबट्यांचे निर्बिजीकरण करून त्याचा निकाल पाहण्यासाठी तीन वर्षे वाट पाहण्यास सांगितले होते. परंतु राज्याने प्रायोगिक तत्वावर निर्बीजीकरण करून सहा महिन्यांनंतर त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. या लक्षवेधीवरील चर्चेत नाना पटोले, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनीही मुद्दे मांडले.
जंगलांना बांबूचे कुंपण
वाघ, बिबट्यांना जंगलातच रोखण्यासाठी ताडोबासारख्या घनदाट जंगलांभोवती बांबू कुंपणासारखा लावला जाईल. आपल्या जंगलात फळ देणारी झाडे शिल्लक नसल्याने बिबट्या आणि इतर मांसाहारी प्राण्यांचे भक्ष्य जंगलाबाहेर पडत आहे. म्हणून मी अधिकाऱ्यांना फळ देणारी झाडे लावण्यास सांगितले आहे, अशीही महिती नाईक यांनी दिली.
अहिल्यानगरात बिबट्या बचाव केंद्र
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला. जुन्नर क्षेत्रातील एकमेव बिबट्या बचाव केंद्रांची क्षमता वाढवली पाहिजे. त्यावर नाईक यांनी सांगितले की, जुन्नरमधील केंद्राची सेवन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही एक नवे बचाव केंद्र प्रस्तावित आहे.
Forest Minister Ganesh Naik on Leopard Attack Solution Goats Forest Habitat Photos Videos Report
महत्वाच्या बातम्या
- गुजरातेत 6 वर्षांच्या चिमुरडीवर निर्भयासारखे क्रौर्य; बलात्कारात अपयशी ठरल्याने गुप्तांगात रॉड घातला, आरोपीला अटक
- पार्थ पवारांचा जमीन घोटाळा; शीतल तेजवानीने लपवून ठेवलेले दस्त अखेर जप्त, मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण
- India Russia : भारतीय वस्तू 40 ऐवजी 24 दिवसांत रशियात पोहोचतील; मोदी-पुतिन यांच्या करारामुळे 6000 किमीची बचत
- SIR Process : SIR प्रक्रिया-तामिळनाडूत 84 लाख मतदारांचे अर्ज जमा नाहीत; नाव वगळले जाऊ शकते, 11 डिसेंबर अंतिम तारीख