• Download App
    महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ अभियान राबविणार : यशोमती ठाकूर; मंत्रालयातील बैठकीनंतर निर्णय । For the release of women prisoners ‘Mission Mukta’ campaign : Yshomati Thakur

    महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ अभियान राबविणार : यशोमती ठाकूर; मंत्रालयातील बैठकीनंतर निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील कारागृहात बंदी असलेल्या महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. For the release of women prisoners ‘Mission Mukta’ campaign : Yshomati Thakur

    राज्यातील महिला कारागृहात अनेक महिला कच्चे कैदी आहेत. अनेकदा क्षुल्लक प्रकरणात कोठडीची शिक्षा होते. जामिन मिळवण्याचा मार्ग उपलब्ध असतो. मात्र नक्की काय करायला हवे? कुठल्या प्रकारे अर्ज करावा? याची माहिती नसल्याने, पुरेशी आर्थिक स्थिती नसल्याने तसेच काही तांत्रिक मुद्दयांमुळे अशा महिलांना जामिन मिळत नाही.



    अशी प्रलंबित प्रकरणे लवकर सोडवून या महिला कैद्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभाग कोणती भूमिका बजावू शकतो, याबाबत मंत्रालयात बैठक घेतली, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ही मोहीम राबविण्यात येईल. या दृष्टीने संबंधित विभागांची मदत घेतली जाईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

    • महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ अभियान
    • कारागृहात अनेक महिला कच्चे कैदी आहेत
    • क्षुल्लक प्रकरणात महिलांना कोठडीची शिक्षा
    • सुटकेबाबत महिलांना करणार प्रबोधन करणार
    • महिला आणि बालकल्याण विभाग मदत करणार

    For the release of women prisoners ‘Mission Mukta’ campaign : Yshomati Thakur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातल्या नदीजोड प्रकल्पांना मोदी सरकारची गती; जलजीवन मिशनच्या योजनेलाही नवसंजीवनी!!

    भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तोंड कडूच!!; देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत तीव्र पडसाद!!

    Bawankule : मोदी-फडणवीसांवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा; बावनकुळे यांचा सपकाळांवर पलटवार