• Download App
    शिवसेनेतली खदखद दुसऱ्या नेत्याच्या पत्रातून पुन्हा बाहेर; विजय शिवतारेंचे काँग्रेस आमदार संजय जगतापांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र|For the first time in Puducherry, there are two BJP ministers

    शिवसेनेतली खदखद दुसऱ्या नेत्याच्या पत्रातून पुन्हा बाहेर; विजय शिवतारेंचे काँग्रेस आमदार संजय जगतापांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

    प्रतिनिधी

    पुणे : शिवसेनेत सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांबद्दलच मोठी खदखद आहे. आधी ती राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्यातील वादाच्या रूपाने पुढे आली. नंतर ती आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातून बाहेर आली. आता पुरंदरचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पत्रातून आणखी रूंदावली आहे.For the first time in Puducherry, there are two BJP ministers

    विजय शिवतारे सध्या आजारी आहेत आणि ते हॉस्पिटलमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिल्याची बातमी आली आहे.या पत्रात विजय शिवतारे म्हणतात, की माझ्य़ा राज्य मंत्रिपदाच्या काळात मोठ्या मेहनतीतून मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले.



    प्रकल्पाच्या बंद जलवाहिनीच्या कामालाही सुरुवात केली आहे. मात्र, या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम कॉंग्रेसचे स्थानिक आमदार संजय जगताप हे करीत आहेत. तोंडल येथे काम सुरू केल्यानंतर अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा संजय जगतापांचा आग्रह आहे, असा गंभीर आरोप विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

    या कामाचा शुभारंभ आपल्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावा, तो ऑनलाईन झाला तरी चालेल, अशी इच्छाही विजय शिवतारे यांनी पत्रातून उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे.

    विधानसभेची आगामी निवडणुकाही आम्ही एकत्रितपणे लढू, असा दावा महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे काही नेते करीत असतात. परंतु, शिवसेना आमदारांचा स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या नेत्यांशी जबरदस्त संघर्ष आहे. विजय शिवतारे हे त्यापैकी एक आहेत.

    त्यातही अजय चौधरी आणि प्रताप सरनाईक यांनी उघडपणे महाविकास आघाडीतील घटक पक्षांबाबत तक्रारी केल्यानंतर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना उघडपणे पत्र लिहून काँग्रेस आमदाराविरोधात तक्रार केल्याने खुद्द शिवसेनेतही सारे काही आलबेल नाही, हे देखील स्पष्ट होत आहे.

    For the first time in Puducherry, there are two BJP ministers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल