मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपने आंदोलन केले.विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.For local travel permission BJP’s agitation in Mumbai
या वेळीआमदार मनीषा चौधरी आणि सुनील राणे उपस्थित होते.गेल्या ऑगस्ट महिन्यापासून लोकल सेवा सामान्यांसाठी बंद आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. अनेकांचे लसीकरण झाले आहे. काहींनी एक तर काहींनी दोन्ही डोस घेतले आहेत.
त्यामुळे दोन डोस घेतलेल्याना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांसाठी लोकल ही जीवन वाहिनी आहे. रास्त दरात प्रवास करण्याचे एक मोठे साधन आहे. तेच बंद केल्याने अनेकांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे ही सेवा पुन्हा बहाल करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.या आंदोलनादरम्यान रेल्वेमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या मागण्यांचे निवेदनावर उपस्थितांचे हस्ताक्षर घेण्यात आले.
- लोकल प्रवासास परवानगी देण्याची मागणी
- भाजपचे मुंबईत आंदोलन
- कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मुभा द्या
- अनेकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे
- लोकल बंदीमुळे अनेकांची आर्थिक कोंडी
- रास्त दरात प्रवास करण्याचे एक मोठे साधन