• Download App
    घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी आरोपीला पुण्यात बेड्या |For 28 years on a burglary charge Fugitive accused handcuffed in Pune

    घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी आरोपीला पुण्यात बेड्या

    वृत्तसंस्था

    पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून  पोलिसांना गुंगारा देणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली. विष्णू विटकर (वय 45, रा. हडपसर), असे आरोपीचे नाव आहे.For 28 years on a burglary charge Fugitive accused handcuffed in Pune

    गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने त्याला अटक केली.त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  त्याने 1992 मध्ये कोथरुड ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केली होती.गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक हद्दीत गस्त घालत होते.



    त्यावेळी घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी असलेला आरोपी हडपसर गाडीतळ येथे येणार असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार महेश निंबाळकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून विष्णू विटकरला ताब्यात घेतले.

    चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे,  वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, संतोष क्षिरसागर, सुजित पवार, विल्सन डिसोझा, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे, महेश निंबाळकर यांच्या पथकाने केली.

    For 28 years on a burglary charge Fugitive accused handcuffed in Pune

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!