• Download App
    मेघर्जनेसह कोसळणार पाच दिवस पाऊस; पुण्यासह मुंबई-ठाण्यासाठी हवामान खात्याचा इशारा । Five days of rain with thunderstorms; Meteorological Department warning for Mumbai-Thane including Pune

    मेघर्जनेसह कोसळणार पाच दिवस पाऊस; पुण्यासह मुंबई-ठाण्यासाठी हवामान खात्याचा इशारा

    वृत्तसंस्था

    पुणे : महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट घोषित केला आहे. दक्षिण भारतातील बहुतांशी राज्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागातही पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. Five days of rain with thunderstorms; Meteorological Department warning for Mumbai-Thane including Pune



    पुढचे ५ दिवस दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह व कोल्हापूर सातारा जोरदार पावसाची शक्यता असून मुंबई ठाणे परिसरात हलका पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील काही तासांत जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहणार असून हवेचा वेग ४० किमी प्रतितास असेल. रायगड, पुणे, अहमदनगर आणि नांदेड या चार जिल्ह्यांत देखील ढगाळ हवामान आहे. पुढील काही तासात या जिल्ह्यातपावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढील चार राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.

    Five days of rain with thunderstorms; Meteorological Department warning for Mumbai-Thane including Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस