• Download App
    पुण्यामध्ये नायजेरियन तस्कराकडून साडेपाच लाखांचे कोकेन हस्तगत|Five and a half lakh cocaine seized from Nigerian smugglers in pune

    पुण्यामध्ये नायजेरियन तस्कराकडून साडेपाच लाखांचे कोकेन हस्तगत

    वृत्तसंस्था

    पुणे : कोकेन अमली पदार्थाची विक्री करणा-या नायजेरियन तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. Five and a half lakh cocaine seized from Nigerian smugglers in pune

    ओलमाईड किस्तोफर कायोदे (वय ४२, रा. वडाची वाडी, मूळ नायजेरिया) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ३० हजार रुपयांचे ५३ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.उंड्री वडाचीवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये नायजेरियन तरुण राहत असून तो चोरून कोेकेनची विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अमलदार योगेश मोहिते यांना मिळाली.



    त्यानुसार निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे ५३ ग्रॅम कोकेन आढळले. त्याच्याविरुद्ध कोंढवा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण शिर्के, सुजित वाडेकर, संदीप जाधव, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी यांच्या पथकाने केली.

    Five and a half lakh cocaine seized from Nigerian smugglers in pune

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Sudhir Mungantiwar : राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज; TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

    Lohagad Murder Case : सियाने केतनकडून ₹1 कोटी घेऊन चेतनला दिले; कॅब ड्रायव्हरचा दावा – सियाची बालीला जाण्याची इच्छा नव्हती, पासपोर्टही गायब केला

    Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच’ असल्याचा पुनरुच्चार