वृत्तसंस्था
पुणे : कोकेन अमली पदार्थाची विक्री करणा-या नायजेरियन तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. Five and a half lakh cocaine seized from Nigerian smugglers in pune
ओलमाईड किस्तोफर कायोदे (वय ४२, रा. वडाची वाडी, मूळ नायजेरिया) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ३० हजार रुपयांचे ५३ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.उंड्री वडाचीवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये नायजेरियन तरुण राहत असून तो चोरून कोेकेनची विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अमलदार योगेश मोहिते यांना मिळाली.
त्यानुसार निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे ५३ ग्रॅम कोकेन आढळले. त्याच्याविरुद्ध कोंढवा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण शिर्के, सुजित वाडेकर, संदीप जाधव, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी यांच्या पथकाने केली.
Five and a half lakh cocaine seized from Nigerian smugglers in pune
विशेष प्रतिनिधी
- स्विस बँकांमध्ये भारतीयांचे पैसे वाढले तिपट्ट , कोरोना काळातील चित्र; २० हजार कोटी जमा
- सुवेंदू अधिकारी यांच्या विजयला आव्हान, ममता बॅनर्जी आज उच्च न्यायालयात
- मोहम्मद अझहरुद्दीन यांना मोठा धक्का ; हैदराबाद क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवले
- सुंदर पिचई यांचे देशप्रेम, भारताला कोरोना संकटावर मदत करण्यासाठी गुगल करणार ११३ कोटींची मदत
- प्रदीप शर्मा : सचिन वाझेचा एकेकाळचा बॉस, ११३ एन्काऊंटर, शिवसेनेच्या उमेदवारीवर हितेंद्र ठाकूरलाही नडला
- होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, संजय राऊत यांनीच मान्य केले