• Download App
    लवकरच सुरू होणार राज्यात पहिली ते चौथी शाळा ? टास्क फोर्स सोबत चर्चा करून लवकरच निर्णयाची घेणारFirst to fourth schools in the state to start soon? A decision will be taken soon in consultation with the task force

    लवकरच सुरू होणार राज्यात पहिली ते चौथी शाळा ? टास्क फोर्स सोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेणार

    मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोव्हीड टास्क फोर्स सोबत चर्चा करून लवकरच पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णयाची शक्यता आहे.First to fourth schools in the state to start soon? A decision will be taken soon in consultation with the task force


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता प्राथमिक शाळाही सुुरू होण्याच्या मार्गावर आहेत. प्राथमिक वर्ग लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत.

    राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकरात्मक असून पुन्हा शाळा सुरू करण्यावर जोर आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोव्हीड टास्क फोर्स सोबत चर्चा करून लवकरच पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णयाची शक्यता आहे.

    काल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जवळपास सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करत असताना जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाइन बैठक घेऊन चर्चा केली.

    राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा,त्याअनुषंगाने तयारी,लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला.या बैठकीत जवळपास सगळ्याच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला.

    राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने ‘आदर्श शाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले.

    First to fourth schools in the state to start soon? A decision will be taken soon in consultation with the task force

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस