विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajitdada उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकुटुंब भेट घेतली. शरद पवारांच्या बंगल्यावर त्यांनी विविध मुद्यांवर 35 मिनिटे चर्चाही केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उद्योजक गौतम अदानीही शरद पवारांच्या घरी पोहोचले. त्यामुळे उद्धवसेना चिंतित झाली आहे.Ajitdada
महायुतीने ऑपरेशन वॉच म्हणजे शरद पवार गटाला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी झाल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे 10 दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही पवारांची दिल्लीतच भेट घेतली होती. या घडामोडींचा काँग्रेसवर परिणाम दिसून आला नाही.
मात्र, उद्धवसेनेत चिंतेचे वातावरण पसरले. ज्या शरद पवारांच्या बळावर आपण भाजप, शिंदेसेनेला कायम खालच्या पातळीवर जाऊन हिणवले. तेच भाजपसोबत जाणार असतील तर आपण काय करावे, अशी भावना उद्धवसेनेचे नेते व्यक्त करत असल्याची चर्चा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत दोन्ही गटांच्या युतीची शक्यता
अजित पवार- शरद पवार भेटीविषयी अनेक तर्क लावले जात आहेत. जसे की, लोकसभेतील पराभवाची परतफेड अजित पवारांनी विधानसभेत केली. आता डॅमेज कंट्रोलसाठी पावले उचलली. अर्थातच शरद पवारांची संमती आहे. याशिवाय अशीही चर्चा आहे की, अजित पवारांनी भाजपला अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे की, भविष्यात भाजपने त्यांना सोडले तर ते पुन्हा काकांसोबत जाऊ शकतात.
मविआचे खरे अस्तित्व शरद पवारांमुळेच आहे. या भेटीमुळे उद्धव ठाकरेंना काका-पुतण्याच्या एकत्र येण्याची भीती आहे. असे झाल्यास महाविकास आघाडी कमकुवत होऊ शकते.
गरज पडल्यास शरद पवार यांच्याशी थेट राजकीय संवाद साधण्यासाठी अजित पवार यांच्या रूपाने भाजपला मोठा पर्याय मिळाला आहे. लोकसभा, विधानसभेला पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता कमी होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची दाट शक्यता आहे. कारण या निवडणुकीत महायुतीमध्ये सामील असलेले पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, असे म्हटले जात आहे.
काय म्हणाले अजितदादा….
अजित पवार म्हणाले की, राजकारणापलिकडील नाती जपण्यासाठी मी आणि माझे सहकारी आलो होतो. शरद पवारांशी मंत्रिमंडळ विस्तार, परभणीतील अशांतता या विषयांवर चर्चा केली. 13 डिसेंबरला प्रतिभाकाकींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठीही येणार आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, कुटुंबात कटुता असता कामा नये. युगेंद्र पवारांनी सांगितले की, ही भेट पूर्णत: अराजकीय होती.
First Ajitdada, Amit Shah and then Adani met Sharad Pawar, causing a stir in the Uddhav Sena’s stomach, what if Pawar also joins the NDA?
महत्वाच्या बातम्या
- Tamil Nadu तामिळनाडूतील खासगी रुग्णालयास भीषण आग, 7 जणांचा मृत्यू
- BMC elections : बीएमसी निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिंदेंचं मोठे वक्तव्य, म्हणाले…
- One Nation One Election : विधेयकाला मोदी सरकारची मंजूरी, पण ते JPC कडे पाठवायची काँग्रेसची तयारी!!
- Dantewada : दंतेवाड्यात नक्षलवादी अन् सुरक्षा दलांमध्ये चकमक, सात माओवादी ठार