• Download App
    वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा कॉंग्रेस आमदार मोकाट आणि अटकेची मागणी करणाऱ्या भाजप खासदारांवर गुन्हा FIR registred again BJP MP Ramdas Tadas for demanding action against Congress MLA Ranjit Kamble

    वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा कॉंग्रेस आमदार मोकाट आणि अटकेची मागणी करणाऱ्या भाजप खासदारांवर गुन्हा

    राज्यातील ठाकरे सरकारचे सुडबुद्धीचे राजकारण पोलिसांतर्फे सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा कॉंग्रेस आमदार मोकाट आणि त्यांच्यावर कारवाई करावी म्हणणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांवर वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIR registred again BJP MP Ramdas Tadas for demanding action against Congress MLA Ranjit Kamble


    विशेष प्रतिनिधी

    वर्धा : राज्यातील ठाकरे सरकारचे सुडबुद्धीचे राजकारण पोलिसांतर्फे सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा कॉंग्रेस आमदार मोकाट आणि त्यांच्यावर कारवाई करावी म्हणणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांवर वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



     

    आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याची तत्परता दाखविण्यात आली नाही पण तडस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे खासदार तडस यांच्या पत्रकार परिषदेत निगराणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी खास पथक पाठविले होते.

    पत्रकार परिषदेत तडस म्हणाले, आमदार कांबळे यांनी यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना धमकावलं आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने तक्रार न केल्यानं कांबळेंची हिंमत वाढली. अनेक अधिकारी विनंतीवर बदली करून घेत जिल्हा सोडून गेले. मात्र, डॉ. डवले यांनी हिंमत दाखवून पोलीस तक्रार केली. या तक्रारीची तत्काळ दखल न घेतल्यास आरोग्य यंत्रणा नाराज होऊ शकते. याचा विपरित परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाल्यास कांबळे हेच जबाबदार असतील. त्यामुळे कांबळे यांना अटक करावी.

    वर्धा जिल्ह्यातील नाचन गाव येथे ९ मे रोजी आरटीपीसीआर चाचणी आरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराची छायाचित्रं काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर टाकली होती. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे यांनी डॉ. डवले यांना फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. “तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता… तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार, अशी शिवीगाळ केली. तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावलं आहे,” असा आरोप डॉ. डवले यांनी केला होता.

    डॉ. डवले यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आमदार रणजित कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेनंही केली होती. संबंधित आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा व नियमानुसार कारवाई करावी, नसता राज्यातील आरोग्य सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा विनंती वजा इशारा संघटनेनं दिला होता. त्यानंतर कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    FIR registred again BJP MP Ramdas Tadas for demanding action against Congress MLA Ranjit Kamble

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!