• Download App
    मुख्यमंत्र्यांवर अश्लील टीका केल्याबद्दल संजय राऊतांवर नाशिक मध्ये गुन्हा; तरीही सामनातून कमळाबाई म्हणून टीका!!|Fir against Sanjay Raut in nashik, but saamna editorial used the same slur language

    मुख्यमंत्र्यांवर अश्लील टीका केल्याबद्दल संजय राऊतांवर नाशिक मध्ये गुन्हा; तरीही सामनातून कमळाबाई म्हणून टीका!!

    प्रतिनिधी

    मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी वाटेल त्या शब्दांमध्ये भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे.Fir against Sanjay Raut in nashik, but saamna editorial used the same slur language

    ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अश्लील शब्दांमध्ये टीका केली आहे. महाराष्ट्रात सध्या चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जाती आहे ते आम्हाला न्याय देत आहे, अशा अश्लील शब्दांमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली. याबद्दल त्यांच्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने नाशिक मध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.



    हा गुन्हा काल दाखल झाला आहे. पण आज सामनाच्या अग्रलेखात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या वरच्या टीकेच्या रोखाची भाषा अजिबात सौम्य झालेली नाही. शिंदे गटाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चोरले म्हणून कमळाबाई घुंगरू निसटेपर्यंत नाचत आहे. अमित शाह हे महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकाचे शत्रू आहेत, अशा आशयाचे टीकास्त्र सामनाच्या अग्रलेखातून सोडण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर अश्लील भाषेत टीका केल्याबद्दल संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला. तरी देखील सामनाच्या अग्रलेखातही तशीच भाषा वापरली. त्यावर आता कोणती कायदेशीर कारवाई होणार?, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

    Fir against Sanjay Raut in nashik, but saamna editorial used the same slur language

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस