• Download App
    गुन्हे दाखल करा, घाबरत नाही, चंद्रकांत पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांना ठणकावले|File a case, don't be afraid, Chandrakant Patil slapped Dilip Walse Patil

    गुन्हे दाखल करा, घाबरत नाही, चंद्रकांत पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांना ठणकावले

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या धमक्या देता, आधी अनिल देशमुख होते आता तुम्ही आलात़ काय गुन्हे दाखल करायचे ते करा आम्ही घाबरत नाही़ अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठणकावले आहे.File a case, don’t be afraid, Chandrakant Patil slapped Dilip Walse Patil


    विशेष प्रतिनिधी 

    पुणे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या धमक्या देता, आधी अनिल देशमुख होते आता तुम्ही आलात़ काय गुन्हे दाखल करायचे ते करा आम्ही घाबरत नाही़ अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठणकावले आहे.

    ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना सोडविण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांवर, शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याचा इशारा गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला आहे. यावर पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
    पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे आरएसएस व जनकल्याण समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़



    पाटील म्हनालेे, कोरोना आपत्तीत एकत्र येऊन काम करण्याऐवजी राज्यातील सरकार केवळ रोज नवनवीन खोटे आरोप केंद्र सरकार व विरोधी पक्षांच्या नेत्यांवर करीत आहे़. पण आम्हीही राजकारणांमधील माहिर आहोत, अभ्यासपूर्ण व आकडेवारीसह बोलत असतो़. देशात सर्वाधिक लस ही महाराष्ट्राला दिल्या गेल्या. या सरकारने त्यांचाही काळाबाजार केला. लसीबाबत महाराष्ट्र सरकारने श्वेतपत्रिकाजा

    ते म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शन देताना संबधित कंपनीने अ‍ॅडव्हास मागितला होता परंतु, राज्य सरकारने त्यास नकार दिला़ तेव्हा भाजपने काही लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला़ परंतु, दमबाजी करून संबंधित कंपनी मालकावर दबाव आणला जात असून,

    श्रेय दुसऱ्याला जाऊ नये यासाठी राज्य सरकार हा प्रकार करीत आहे़ तुम्हाला जनतेला रेमडेसिविर इंजेक्शन द्यायचे होते तर विना टेंडर तुम्ही ते खरेदी करू शकला असता, पण केवळ हे सरकार कमिशनसाठी अडून बसल्याचेही ते म्हणाले़

    आम्ही एकत्र येऊन काम करण्यास तयार आहोत पण या सरकारकडून सुरू असलेले राजकारण योग्य नसल्याचे पाटील यांनी सांगितले़ आज सत्ता गेली चुलीत, सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधींना घरात बसू देणार नाहीत अशी स्थिती आली आहे़

    म्हणूनच सत्तेतील काही आमदार सरकारविरोधातच आंदोलन करायला निघाले आहेत़ पण आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करून कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडीकडून चालू असल्याचेही ते म्हणाले़

    भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या स यादीतून प्रत्येकी दोन लाख रूपये जमा करून दोन कोटी २० लाख रूपयांचे दोन ऑक्सिजन प्लांट भाजपकडून उभारण्यात येणार असून, येत्या आठवडाभरात शहरात आम्ही दोन हजार आॅक्सिजन बेड सेवेत देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले़

    दरम्यान आपल्या आमदार निधीतील सर्व निधी म्हणजे ४ कोटी व वर्षभरात दीडपट खर्चाची मर्यादा असल्याने सर्व मिळून ६ कोटी रूपये कोरोना आपत्ती निवारणासाठी महापालिकेसाठी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहिर केले़

    File a case, don’t be afraid, Chandrakant Patil slapped Dilip Walse Patil

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस