• Download App
    अटकेच्या भीतीने अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळण्याची मागणी|Fearing arrest, Anil Deshmukh ran to the Supreme Court seeking protection from ED action

    अटकेच्या भीतीने अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समन्स पाठविले जात असूनही अटकेच्या भीतीने कार्यालयात येण्याचे टाळणाºया अनिल देशमुख यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे.Fearing arrest, Anil Deshmukh ran to the Supreme Court seeking protection from ED action

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनायलयाने तीन वेळ समन्स बजावले आहेत. ईडीकडून तिसरे समन्स बजावण्यात आल्यानंतर आता अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांनी याबाबतची माहिती दिली आहे.



    आपल्याविरोधात कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई केली जाऊ नये. त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
    यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांना दोन वेळा समन्स बजावत प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलावले होते.

    मात्र, वय, आजारपण आणि कोरोना यांचे कारण देत अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला हजर राहण्यास नकार दिला होता. यानंतर ईडीकडे प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी वेळ मागितली होती. ती मुदत ५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीआहे.

    अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांना देखील समन्स बजावण्यात आले आहे. त्यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांनी दोन वेळा चौकशीसाठी प्रकृती आणि कोरोनाच्या कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचे म्हटले होते.

    तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती. मात्र, अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावले असून त्यांना ५ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ऋषीकेश देशमुख यांना ६ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

    एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने चौकशी सुरू केली आहे. ईडीने देशमुख यांच्या पाच ठिकाणांवर छापे घातले होते. त्यानंतर ईडीने देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली.

    Fearing arrest, Anil Deshmukh ran to the Supreme Court seeking protection from ED action

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा