• Download App
    ओमिक्रॉनची धास्ती, पुण्यात पुन्हा निर्बंध लागू; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका ? |Fear of Omicron, re-imposition of restrictions in Pune; International Film Festival hit?

    ओमिक्रॉनची धास्ती, पुण्यात पुन्हा निर्बंध लागू; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका ?

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यात सुरु होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे लागू झालेल्या निर्बंधांचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.Fear of Omicron, re-imposition of restrictions in Pune; International Film Festival hit?

    आजपासून हा महोत्सव सुरु होत आहे. पुण्यातील चित्रपट आणि नाट्य गृहात प्रेक्षकांच्या संख्येवर निर्बंध नसतील, अशी घोषणा पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच निर्बंधांनी डोकं वर काढले आहे.



    ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चित्रपट आणि नाट्यगृहात सध्याच्या निर्बंधांनुसार ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे..तर खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. या निर्बंधांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका बसण्याची शक्यता आहे.

    महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री नव्याने आदेश जारी केले. चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह यासह इतर बंदीस्त जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहे

    Fear of Omicron, re-imposition of restrictions in Pune; International Film Festival hit?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!