• Download App
    'राष्ट्रवादी'च्या धोरणामुळे उजनीच्या पाण्यावरुन पुणे-सोलापुर यांच्यात जिल्हा वाद पेटण्याची भीती? -'सोलापुरकरांनी आमची खोडी काढली, आम्ही गप्प बसणार नाही,' Fear of district dispute between Pune and Solapur over Ujani dam water due to NCP's policy?

    ‘राष्ट्रवादी’च्या धोरणामुळे उजनीच्या पाण्यावरुन पुणे-सोलापुर यांच्यात जिल्हा वाद पेटण्याची भीती? -‘सोलापुरकरांनी आमची खोडी काढली, आम्ही गप्प बसणार नाही,’

    दुष्काळी सोलापुर जिल्ह्यासाठी प्रामुख्याने बांधण्यात आलेल्या उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर आणि बारामती तालुक्यांना देण्याचा घाट ठाकरे-पवार सरकारने घातला होता. सोलापुरकरांनी जोरदार विरोध करत हे प्रयत्न हाणून पाडले. पण सत्ताधाऱ्यांच्या दुहेरी धोरणामुळे अकारण जिल्हा वाद पेटण्याची भीती निर्माण झाली आहे. “सोलापुरकरांनी आमची खोडी काढली, आम्ही गप्प बसणार नाही,” असे म्हणत इंदापुरचे शेतकऱ्यांनी त्याची झलक दाखवून दिली. Fear of district dispute between Pune and Solapur over Ujani dam water due to NCP’s policy?


    प्रतिनिधी

    पुणे  : उजनी धरणातून पाणी वळवण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच जाहीर केले. त्यानंतर सोलापुरच्या शेतकऱ्यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा स्थगित केला. मात्र यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त होताना दिसत आहेत. उजनी धरणातून सोलापुरला पाण्याची तरतूद नसल्याने एकही थेंब येत्या ऑक्टोबरनंतर जाऊ देणार नाही, नदीत सोडलेले पाणीही बंद करू असा इशारा देत इंदापुरजवळच्या कळस येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. 21) रास्ता रोको आंदोलन केले.

    वास्तविक राज्यकर्त्यांसाठी सर्व जनता समान असते. मात्र इंदापुरातून निवडून आलेल्या दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरचे पालकमंत्री म्हणून वेगळी भूमिका मांडली. इंदापुरकरांसमोर ते वेगळे बोलत राहिले. भरणे यांना त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचीही फूस असल्याचे सांगितले जाते. मात्र यातून दोन्हीकडच्या शेतकऱ्यांची दिशाभूल झाली. या मुळे पुणे विरुद्ध सोलापुर असा जिल्हा वाद पेटण्याची भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी घेतलेल्या उलटसुलट भूमिकांमुळे ही शक्यता दिसू लागली आहे.

    पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी कळस (ता. इंदापुर) येथील चौकात रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पाटील म्हणाले की, उजनीतून इंदापूरच्या अवर्षणग्रस्त भागाला दिले जाणारे पाणी आमच्या हक्काचे आहे. त्यास सोलापूरातून होणारा विरोध हे राजकीय द्वेषातून रचलेले षडयंत्र आहे. उजनी धरणामुळे तालुक्यातील विस्थापित झालेल्या लोकांना पाणी मिळत नाही हे वास्तव आहे. तरीही ऑक्टोबरनंतर सोलापुरला अनाधिकृतपणे पाणी दिले जाते. हे नियमबाह्य आहे.

    सध्या नदीतून सोलापुरला दिले जाणारे पाणीही आम्ही बंद पाडू. सोलापूरकरांनी आमची खोडी काढली, त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. पुण्याच्या सातत्याने वाढत चाललेल्या पाण्याच्या मागणीमुळे खडकवासला धरणसाखळीतून पुण्यातील तालुक्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिकांमधून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने हे पाणी तसेच धरणात येते. हेच सांडपाणी बारामती-इंदापुरकरांना मिळावे, असे आंदोलनकर्ते म्हणाले.

    “राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळे शेटफळगढे उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. मात्र जलसंपदा मंत्र्यांनी ही सिंचन योजना रद्द केल्याचे जाहीर केल्याने ताटात वाढलेला घास परत घेतल्यासारखे झाले आहे. इंदापुर तालुक्यातील ६० हजार एकर क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. इंदापूरकरांना पाणी देण्यास विरोध करणारे सोलापूरातील लोकप्रतिनीधी उजनीतून बोगस पाणी पळवित असल्याची बाबही समोर आली आहे. यामुळे सोलापूरकरांना नदीतून देण्यात येणारे पाणी बंद पाडण्यात येईल,” असा इशारा इंदापुरच्या शेतकऱ्यांनी दिला.

    हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचेही यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सुमारे तासभराच्या रास्ता रोकोनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. बाबामहाराज खारतोडे, माजी सरपंच गणेश सांगळे, पोलिस पाटील तुकाराम खाडे यांच्यासह शेतकरी कृती समितीचे अन्य सदस्य यात सहभागी झाले होते. वालचंदनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

    Fear of district dispute between Pune and Solapur over Ujani dam water due to NCP’s policy?

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!