• Download App
    शेतकऱ्यांप्रमाणे मनोरंजन क्षेत्रही आत्महत्येच्या उंबरठ्यावर ; अभिजित पानसे यांचा इशारा | farmers, the entertainment sector is on the verge of suicide; Warning of Abhijit Panse

    शेतकऱ्यांप्रमाणे मनोरंजन क्षेत्रही आत्महत्येच्या उंबरठ्यावर ; अभिजित पानसे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठी, हिंदी मालिकांच्या चित्रीकरणाला महाराष्ट्रात परवानगी देण्याची मागणी दिग्दर्शक, लेखक अभिजीत पानसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. farmers, the entertainment sector is on the verge of suicide; Warning of Abhijit Panse

    चित्रीकरणाबाबत राज्य सरकारने आता जर पावले उचलली नाही तर शेतकऱ्यांच्या पाठोपाठ मनोरंजन क्षेत्रातील आत्महत्या होतील, असा इशारा त्यांनी दिला.



    गेल्या महिन्याभरापासून राज्यात चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे निर्माते गोव्यात आणि पुढे दमण, सिल्वासाला चित्रीकरणासाठी गेले. तिथे परवानगी मिळते तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल अभिजीत पानसे यांनी विचारला आहे.

    त्यांनी ट्विटमधूनही सांस्कृतिक खात्याला चित्रिकरण सुरू करण्याची विनंती केली. कोरोनाचे नियम पाळून चित्रीकरण करता येणे शक्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

    मालिकांच्या चित्रीकरणात गोव्याचा अपवाद वगळता अडचण आलेली नाही. यावरून अभिजीत पानसे म्हणाले, ‘मनसे मार्फत रंगमंच कामगारांना अन्नधान्य वाटप केलं बायोबबल महाराष्ट्रात होऊ शकतो.

    चित्रीकरण होऊ शकतील. अनेक मोठ्या रेसॉर्टमध्ये परवानगी दिली तर कामगारांचा प्रश्न मार्गी लागेल. शिवाय, सिल्वासा, दमण आदी भागापेक्षा आपल्याकडे नक्कीच जास्त सुविधा आहेत.’

    farmers, the entertainment sector is on the verge of suicide; Warning of Abhijit Panse

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस