• Download App
    कर्जवसूलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा नको; राज ठाकरे भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश|farmers for debt recovery; Chief Minister's order after meeting Raj Thackeray

    कर्जवसूलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा नको; राज ठाकरे भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश

    प्रतिनिधी

    मुंबई : अवकाळी पावसाने आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी तगादा लावू नये, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.farmers for debt recovery; Chief Minister’s order after meeting Raj Thackeray

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विविध शिष्टमंडळांनी सह्याद्री अतिथीगृहात आज भेट घेतली. आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते.



    नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्जधारक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या जप्ती आणि लिलाव काढल्याबद्दल शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सध्याची परिस्थितीत लक्षात घेता अल्प कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

    या बैठकीत काजूसाठी हमी भाव जाहीर करणे, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास, सिडको गृहनिर्माण लॉटरी सोडतधारकांच्या विविध समस्या, दादर मासळी मंडईच्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या.

    farmers for debt recovery; Chief Minister’s order after meeting Raj Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस