विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : शहरात लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. बोगस प्रमाणात देणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यात दोन पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.Fake certificates of corona vaccination; Three persons arrested in Mumbai
एपीएमसी मसाला मार्केटमध्ये कोरोनाचे लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात बनावट प्रमाणपत्रे जप्त केली आहेत.
नितीन आंनदराव याचे एपीएमसी मार्केटमध्ये ऑनलाईन सेवा केंद्र आहे. विराज वाक्षे व अमोल झेंडे हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमटीमध्ये कंत्राटी वाहक आहेत. या तिघांनी पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आयडी वापरून बनावट प्रमाणपत्रे तयार करत होते. एक प्रमाणपत्र ते ३ हजार रुपयांना विकत होते, अशी माहिती एपीएमसी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली.
Fake certificates of corona vaccination Three gangsters arrested in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- दररोज 12 km चालत जाऊन लहान मुलांना आणि स्त्रियांना पुस्तके देणारी चालती बोलती लायब्ररी म्हणजे पी सुकुमारण
- ओमिक्रॉनच्या दशहतीदरम्यान नवी मुंबईत १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, कतारहून परतले होते एका विद्यार्थ्यांचे वडील
- सीमा सुरक्षा दलाने पाडले पाकिस्तानी ड्रोन, चीनमध्ये निर्मिती झाल्याचे स्पष्ट, पाककडून शस्त्रे, स्फोटकांसाठी सर्रास वापर
- ओमीक्रॉनमुळे सांगलीच्या व्यापारी पेठांतील उधारी बंद; छोट्या व्यापाऱ्यांचे हाल सुरु