नाशिक : बारामतीत फसली डिनर डिप्लोमसी; व्यासपीठावर येऊन करावी लागली शिंदे फडणवीस सरकारची स्तुती!!, अशी शरद पवारांच्या आजच्या नमो रोजगार मेळाव्यातल्या भाषणातली अवस्था झाली.Failed Dinner Diplomacy at Baramati; Shinde had to come to the platform and praise the Fadnavis government!!
शरद पवारांनी फार मोठी गुगली टाकत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेतल्या जेवणाचे निमंत्रण दिले, पण शिंदे – फडणवीस यांनी पवारांच्या गुगली वर षटकार मारत अत्यंत सभ्यपणे पत्र लिहून त्यांचे निमंत्रण फेटाळले. पण ज्या खऱ्या कारणासाठी शरद पवारांनी पत्र लिहून गोविंद बागेतल्या जेवणाचे निमंत्रण दिले होते, ते मात्र पवारांना साध्य करवून घेता आले. शरद पवारांना नमो रोजगार मेळाव्यात माजी मुख्यमंत्री म्हणून व्यासपीठावर स्थान मिळाले. ते फडणवीस यांच्या शेजारी बसले. त्यांना सरकारने भाषणाची संधी दिली. पण या भाषणात पवारांना शिंदे – फडणवीसांचीच स्तुती करावी लागली. तरुणांना रोजगार देण्याच्या कामात आणि विकासाच्या कामात आपण राजकारण करत नाही. सहकार्याचीच भूमिका घेतो, असे सांगावे लागले. त्याच वेळी राज्यातले शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातले मोदी सरकार रोजगार देण्यात काम करते आहे याची कबुली देखील द्यावी लागली बारामतीतल्या आपल्या राजकीय बालेकिल्ल्यात एरवी शरद पवार सगळ्यात शेवटी भाषण करत असत पण आजच्या सरकार पुरस्कृत त्यांच्या वानप्रस्थ कार्यक्रमात त्यांना सरकारी प्रोटोकॉल नुसार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आधी भाषण करावे लागले ते देखील पाच मिनिटात संपवावे लागले आणि त्यामध्ये त्यांना केंद्र आणि राज्य सरकारची स्थितीच करावी लागली. खासदार सुप्रिया सुळे यांना देखील व्यासपीठावर स्थान मिळाले पण त्यांचे भाषण झाली नाही.
शासकीय कार्यक्रमातल्या चित्रफितीत बारामतीच्या विकासाच्या कामांसंदर्भात शासनाने निर्माण केलेल्या चित्रफितीत अजितदादा, शिंदे – फडणवीस या तिघांची नावे होती, पण शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या नावाचा पुसटसा उल्लेख देखील नव्हता. बारामतीतला नमो रोजगार मेळाव्याचा आजचा शासकीय कार्यक्रम एका अर्थाने पवारांच्या राजकीय वानप्रस्थाचाच कार्यक्रम ठरला!!