प्रतिनिधी
पुणे : मी गुगली टाकली असे लोक म्हणतात. गुगली टाकली की नाही माहिती नाही, पण त्यात फडणवीसांची विकेट गेली, असे सांगत शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीच्या वेळी भाजपला फसवल्याची आज कबुली दिली.Fadnavis wicket was lost, saying Pawar confession of cheating BJP!!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलेल्या मुलाखतीतून पहाटेच्या शपथविधी आधी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याला शरद पवारांची मंजुरी होती. त्यांच्याबरोबर बैठकाही झाल्या होत्या. पण ऐनवेळी शरद पवार मागे फिरले. त्यामुळे अजित पवारांना आमच्याबरोबर येण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. पण शरद पवार यांनी डबल गेम खेळला. त्यामुळे आम्हाला राजीनामा द्यावा लागला, असा गौप्यस्फोट केला.
फडणवीसांच्या या गौप्यस्फोटाला शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. त्यावेळी शरद पवार म्हणाले, लोक म्हणतात की मी भाजपला गुगली टाकली. गुगली टाकली की नाही मला माहिती नाही, पण त्यात फडणवीसांची विकेट गेली. त्यामुळे विकेट गेलेला मनुष्य आपली विकेट गेली असे कसे सांगणार?, त्यामुळे ते इतर मुद्द्यांवरच बोलत आहेत, असा दावा करून पवारांनी आपण भाजपला फसवल्याचीच कबुली दिली.
शरद पवार यांच्या पाठिंब्यानेच पहाटेचा शपथविधी झाला होता. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार यावे म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या या मुलाखतीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कायदा अन् सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे? किती मुली बेपत्ता झाल्या आहेत? याची आकडेवारी दिली.
किती मुली बेपत्ता
राज्यात शिवसेना-भाजपचे नवीन सरकारला येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात राज्यात कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती गंभीर झाली आहे. जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ पर्यंत पुणे शहरातून ९३७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. ठाण्यातून ७२१, मुंबईतून ७३८ मुली बेपत्ता आहेत. तसेच सोलापूरातून ६२ मुली बेपत्ता आहेत. सर्व मिळून २ हजार ६५८ मुली बेपत्ता आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यातील हा आकडा ४ हजारांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. राज्यात दीडवर्षात ६ हजार ८८९ मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातील गृहमंत्र्यांनी बाकीचे वक्तव्य करण्याऐवजी या महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांची हवाली करायला हवे, असे शरद पवार यांनी सांगितले.
समान नागरी कायदा
समान नागरी कायद्यासंदर्भात विधी अयोगाकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे, त्याची माहिती मला नाही. मोदी यांच्याकडे नेमके काय प्रस्ताव आले आहेत, नेमक्या काय सूचना केल्या आहेत, ही माहिती समोर आली पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशात समान नागरी कायद्यासंदर्भात मत व्यक्त केले होते. त्यावर ते बोलत होते. या कायद्यासंदर्भात शीख, ख्रिश्चन समाजातील लोकांचे काय मत आहेस हे जाणून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शिखर बँकेचा घोटाळा
शिखर बँकेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, शिखर बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही लोकांची नाव आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री भाजपचे होते. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, असा दावाही शरद पवार यांनी केला.
Fadnavis wicket was lost, saying Pawar confession of cheating BJP!!
महत्वाच्या बातम्या
- डीके शिवकुमार यांचा CM सिद्धरामय्या यांच्या कार्यक्षमतेवरच सवाल, म्हणाले- त्यांच्या जागी मी असतो तर प्रकल्प केव्हाच झाला असता
- मुख्यमंत्री कोण? हा वाद नाही, आम्हाला दोन्ही नेत्यांचे नेतृत्व मान्य; शिवसेना मंत्री दीपक केसरकरांचा खुलासा
- ‘’निवडणुका संपताच नीट चालायला लागतील, अगोदरही…’’ ममता बॅनर्जींच्या दुखापतीवर अधीर रंजन चौधरींची खोचक टिप्पणी!
- सुप्रिया सुळे – अजित पवार समीकरण बसणे अवघड; महाराष्ट्रातला फेरबदलाचा पेपर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जातोय जड!!