• Download App
    संजय राऊत - जितेंद्र आव्हाड : आधी फडणवीस टार्गेट; कायद्याच्या बडग्यानंतर फडणवीस भेटीचा पॅटर्न Fadnavis target first; Fadnavis visit pattern after law 

    संजय राऊत – जितेंद्र आव्हाड : आधी फडणवीस टार्गेट; कायद्याच्या बडग्यानंतर फडणवीस भेटीचा पॅटर्न

    प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांच्या नेत्यांवर गेल्या 2.5 वर्षात सध्याचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस टार्गेटवर राहिले होते. पण आता वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कायद्याचा बडगा बसताच याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीस भेटीचा पॅटर्न अवलंबला आहे. नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेले संजय राऊत आणि आता विनयभंगाच्या प्रकरणात अडकलेले जितेंद्र आव्हाड हे अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते ही त्याची उदाहरणे आहेत. Fadnavis target first; Fadnavis visit pattern after law

    इतकेच नाही, तर वेगवेगळ्या कारखान्यांच्या घोटाळ्यांमध्ये अडकलेले पश्चिम महाराष्ट्रातले नेते देखील फडणवीसांच्या भेटीचा पॅटर्न अवलंबताना आधीच दिसले आहेत. यामध्ये “पाटलाच्या पोरांना आधीच बाळं होतात”, फेम राजन पाटलांचाही समावेश आहे.



    1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आर्थर रोड जेलची हवा खाऊन आलेले संजय राऊत जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांचा फडणवीसांवरच्या टीकेचा सूर नुकताच नुसताच खाली आला असे नाही, तर त्यांनी फडणवीसांची स्तुती देखील केली. फडणवीस यांनी काही चांगली कामे केली आहेत. त्यांना मानावेच लागेल. कारण तेच सध्या राज्य चालवत आहेत, असे ते पहिल्या पत्रकार परिषदेतच म्हणाले.

    आज देखील राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा सूर मवाळच होता. त्यांनी जरी 2024 मध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असेल, असे राजकीय विधान केले असले, तरी भाजपवरच्या त्यांच्या टीकेचा आधीचा विखार निघून गेला आहे.

    जे संजय राऊत यांचे तेच जितेंद्र आव्हाड यांचे. जितेंद्र आव्हाड नेहमीच देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्वच नेत्यांना ब्राह्मण विरुद्ध बहुजन अशा वादातून टार्गेट करत असायचे. पण त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा 354 कलमाचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांचा सूर नरमला. भले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची पाठराखण करताना महाराष्ट्रात मोठा राजकीय बवाल उभा केला असेल, पण खुद्द जितेंद्र आव्हाड यांचा सूर मात्र आता नरमाईचा झालेला दिसत आहे.

    आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनयभंगाच्या तक्रारीचा नि:पक्षपातीपणाने तपास करण्याची मागणी करणार आहोत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. हा देखील फडणवीस आधी टार्गेटवर आणि कायद्याचा बडगा बसताच भेटीचा पॅटर्न अशी आव्हाडांची देखील स्थिती झाली आहे.

    Fadnavis target first; Fadnavis visit pattern after law

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा

    Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा सिंह कोर्टात भावुक म्हणाल्या- भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल; संन्यासी असूनही बदनामी केली

    Mithi River : मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई; मुंबईतील 8 जागांवर छापेमारी