• Download App
    फडणवीसांनी पुरवला दापोली उपाध्यक्षांच्या मुलीचा हट्ट ; व्हिडीओ कॉल वर साधला संवाद|Fadnavis supplied Dapoli vice president's daughter's hut; Interact with video calls

    फडणवीसांनी पुरवला दापोली उपाध्यक्षांच्या मुलीचा हट्ट ; व्हिडीओ कॉल वर साधला संवाद

    सर्व कार्यकर्त्यांना बैठकी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठेसुद्धा या बैठकीला निमंत्रित होते Fadnavis supplied Dapoli vice president’s daughter’s hut; Interact with video calls


    विशेष प्रतिनिधी

    रत्नागिरी : गुरुवारी कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या भाजपच्या आढावा बैठकी होत्या.यावेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस स्वत: या बैठकीचा आढावा घेणार होते. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठेसुद्धा या बैठकीला निमंत्रित होते.

    दरम्यान बैठकी दिवशीच म्हणजे गुरुवारी केदार साठे यांची मुलगी प्रचिती हिचा वाढदिवस होता. वाढदवसानिमित्त प्रचीतीची इच्छा होती की ,आपल्या वाढदिवशी बाबांनी कुठेही जाऊ नये. पक्षाची बैठक महत्त्वाची होती.



    त्यामुळे साठे यांना बैठकीत उपस्थित राहणे महत्त्वाचे होते.त्यामुळे साठे यांनी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, प्रचिती वेगळाच हट्ट धरुन बसली. ‘जर, देवेंद्र फडणवीस काका मला शुभेच्छा देणार असतील, तरच मी तुम्हाला परवानगी देईन’, असं तिने साठेंना सांगितलं.

    मग साठे बैठकीला उपस्थित राहिले.दरम्यान बैठक संपल्यानंतर केदार साठे यांनी हा किस्सा देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकला. फडणवीसांनीही दापोली उपाध्यक्षांच्या मुलीचा हट्ट पुरवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर केदार साठे यांनी प्रचितीला व्हिडीओ कॉल लावला आणि फडणवीसांनी तिच्याशी संवाद साधला.

    Fadnavis supplied Dapoli vice president’s daughter’s hut; Interact with video calls

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ