• Download App
    वेळ आली तर ऑडिओ - व्हिज्युअल्स जाहीर करीन; फडणवीसांचा श्याम मानव + अनिल देशमुखांना इशारा!! Fadnavis' Shyam Manav + Warning to Anil Deshmukh

    वेळ आली तर ऑडिओ – व्हिज्युअल्स जाहीर करीन; फडणवीसांचा श्याम मानव + अनिल देशमुखांना इशारा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दबाव आणला होता, असा खळबळ जनक दावा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते श्याम मानव (Shyam Manav) यांनी केला होता. तो दावा खरा असल्याचा दावा स्वतः देशमुख यांनी केला होता. Fadnavis’ Shyam Manav + Warning to Anil Deshmukh

    मात्र आता श्याम मानव आणि अनिल देशमुख या दोघांनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर इशारा दिला आहे. माझ्याकडे अनिल देशमुख यांच्या संभाषणांची ऑडिओ व्हिज्युअल आहेत. त्यामध्ये ते शरद पवार, उद्धव ठाकरे वगैरे नेत्यांविषयी काय बोलतात, हे सगळे उघड दिसत आहे. अनिल देशमुख यांच्याच पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी ती ऑडिओ व्हिज्युअल्स माझ्याकडे दिली आहेत, वेळ आली तर तिने जाहीर करीन, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या आरोपांवर उत्तर दिले. त्याचवेळी मनोज जरांगे यांच्या डोक्यावर उपोषणाचा परिणाम झाल्याची टीका देखील त्यांनी केली.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले :

    खरं म्हणजे सीबीआयने जी चार्जशीट दाखल केली आहे, त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की, कशाप्रकारे गिरीष महाजन यांच्यावर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, त्यांना “मोक्का” लागावा यासाठी वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव आणला. गुन्हे दाखल करायला लावले. या संदर्भातील पुरावे मी दिले होते. त्यानंतरच सीबीआयने केस दाखल केली. सीबीआयने कोर्टात चार्जशिट दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने कशाप्रकारे विरोधी पक्षातील आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेस लावणे हे प्रकार सुरु होते. हे आपण पाहिले आहे.

    श्याम मानव इतके वर्ष मला ओळखतात. त्यांनी अशा प्रकारे आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं. मला असं वाटतं इको सिस्टममध्ये आता सुपारीबाज लोकं घुसलेत. दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागलेत का??

    एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे, अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांच्या समोर लागल्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करायला लावला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. ते निर्दोष सुटलेले नाहीत. ते जामिनावर बाहेर आहेत. 100 कोटीच्या वसुली केसमध्ये ते बेलवर बाहेर आहेत. ते सातत्याने आरोप करताय मी शांत आहे. मी अशा प्रकारे राजकारण करत नाही. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही.

    मी स्पष्टपणे सांगतो कारण त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे काही ऑडिओ – व्हिज्युअल्स मला आणून दिले आहेत. त्यात ते शरद पवार, उद्धव ठाकरे, वाझेवर काय बोलताय ते सगळं माझ्याकडे आहे. माझ्यावर वेळ आली तर मी ते सार्वजनिक करीन. रोज जर कोणी खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट करत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावे मी पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही.

    नाट्यनिर्मात्याला फसवण्याची मनोज जरांगे यांची 2013 ची केस आहे. यापूर्वी आधीच त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट निघतं. पण तारखेवर हजर राहिलं तर ते रद्द होते. पुन्हा ते तारखेवर गेले नाही तर त्यांचा वॉरंट रद्द होईल. आमचा त्यात काहीही संबंध नाही. मी त्यांना दोष देणार नाही. उपोषणाच्या शेवटी ते माझ्य़ा आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली होती. उपोषणामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता असं त्यांनी सांगितलं होतं.

    देवेंद्र फडणवीसला टार्गेट करुन कोणाला फायदा आहे. फडणवीसांमुळे कोणाला धोका आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटते!!

    Fadnavis’ Shyam Manav + Warning to Anil Deshmukh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस