प्रतिनिधी
पणजी : “ज्यांची” वक्तव्ये कचराकुंडीत फेकण्याच्या लायकीची आहेत, असे थेट सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे, अशा व्यक्तीबद्दल मला प्रश्न का विचारता?, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना केला.Fadnavis shrugs off questions on Raut
गोव्यात डॉ प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनाच खोचक सवाल केला. “ज्यांची” वक्तव्ये थेट सुप्रीम कोर्टाने कचऱ्याच्या डब्यात फेकायच्या लायकीची आहेत, असे सांगितले आहे त्या व्यक्तीच्या वक्तव्याबद्दल तुम्ही मला प्रश्न का विचारता? आणि माझा तुमचा दोघांचा वेळ का घाललता?, असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी करून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला उडवून लावले.
महाविकास आघाडीची आणि महाराष्ट्राची बदनामी करणे हाच का तुमचा गुड गव्हर्नन्स?, असा सवाल संजय राऊत यांनी आज दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना केला होता. मात्र गोव्यात पत्रकारांशी बोलताना सुप्रीम कोर्टाचा हवाला देत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची वक्तव्ये कचराकुंडीत फेकायच्या लायकीची आहेत, असे सुनावून घेतले आहे.
फडणवीस पत्रकारांना म्हणाले, तुम्ही ज्यांच्या वक्तव्या विषयी प्रश्न विचारत आहात ते काही कोणी राज्याचे प्रमुख आहेत का? कोणत्या पदावर आहेत का? की फार मोठे फिलॉसॉफर आहेत? ज्यांची वक्तव्ये कचऱ्याच्या डब्यात फेकायच्या लायकीची आहेत असे थेट सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, त्यांच्या विषयी प्रश्न विचारून तुम्ही तुमचा आणि माझा वेळ का वाया घालवता?, असा सवाल करून फडणवीस तेथून निघून गेले.
Fadnavis shrugs off questions on Raut
महत्त्वाच्या बातम्या
- गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ? अंकुश काकडे यांचा प्रश्न
- Hindu Minorities : काही राज्यांत हिंदूंना देखील अल्पसंख्यांक दर्जा आणि अधिकार द्यावा; केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र!!
- स्पा सेंटरच्या आडून दिल्लीत दोन ठिकाणी सुरू होते सेक्स रॅकेटचच; बनावट ग्राहक बनून पोलीस ने केली भांडाफोड
- Freedom of expression : खबरदार … मुख्यमंत्रीसाहेबांविरुद्ध पोस्ट टाकेल त्याला चौकामध्ये दिला जाईल चोप ! जळगांव- पत्नीसमोर बेदम मारहाण अन् शिवसैनिकांचा फतवा…