• Download App
    Devendra Fadnavis Shinde Rally Shivaji Park Mumbai Power Warning Photos VIDEOS कफनचोरांना जेलमध्ये टाकून मुंबईत सत्ता स्थापन करणार- फडणवीस, शिंदे म्हणाले- वादापेक्षा मराठी माणूस मोठा, मग वेगळे का झालात?

    Devendra Fadnavis : कफनचोरांना जेलमध्ये टाकून मुंबईत सत्ता स्थापन करणार- फडणवीस, शिंदे म्हणाले- वादापेक्षा मराठी माणूस मोठा, मग वेगळे का झालात?

    Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Devendra Fadnavis सोमवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. या सभेत ठाकरे बंधूंच्या कालच्या सभेवर जोरदार पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी अदानीच्या मुद्द्यावरून गौतम अदानी यांची जिथे भाजपचे सरकार नाही या राज्यांमध्ये किती गुंतवणूक आहे, याची देखील आकडेवारी दाखवली. तसेच ठाकरेंवर टीका करताना फडणवीस म्हणाले, या कफन चोरांना जेलमध्ये टाकून मुंबईत सत्ता स्थापन करणार, असा इशारा देखील दिला.Devendra Fadnavis

    मराठी माणसाच्या नाही, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई- फडणवीस

    मराठी माणसाच्या अस्तित्वाची नाही तर त्यांच्या अस्तित्वाची लढाई. आणि तुम्हीच म्हणजे मराठी, तुम्ही म्हणजे मराठी आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. समोर बसलेली ही जनता म्हणजे मराठी आणि महाराष्ट्र आहे.Devendra Fadnavis



    काल काही लोकांनी माझीच नक्कल केली. पण त्यांना समजायला पाहिजे की नक्कल करता करता काकांची काय परिस्थिती झाली. पण काकांना किमान नक्कल तरी करता येते. पण तुमची काय अवस्था होईल.

    आधी म्हणायचे की हिंदी सक्तीसाठी आम्ही एकत्र आलो अन् आता काय तर आम्ही मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र आलो. या राज्यात हिंदी सक्ती करणारे कोण? २१ सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्रावर माशेलकर समिती तयार झाली. या समितीत उबाठाचे नेते, विजय कदम देखील होते. या समितीत १८ लोक मराठी होते. आता या समितीचा अहवाल सर्वांनी पाहिला. पान नंबर ५६ वर भाषेकरिता उपगट केला. त्यात उबाठाचे नेते विजय कदम होते. त्यात ‘इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी’ असे नमूद केले होते. हा अहवाल उद्धव ठाकरे यांच्या काळातील आहे.

    वेगळे का झालात?, शिंदेंचा ठाकरे बंधूंना सवाल

    एकनाथ शिंदे म्हणाले- आज जे मराठी माणसांच्या नावाने आवाज काढत आहेत. ते सुट्टीवर कुठे जातात हे तुम्हाला माहिती आहे. वादापेक्षा मराठी आमच्यासाठी मोठा आहे. मग वेगळे का झालात. त्यावेळी तुम्हाला बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करावीशी नाही वाटली का? तुम्ही स्वार्थासाठी वेगळे झालात अन् स्वार्थासाठीच एकत्र आलात हे मराठी माणसांना माहिती आहे. हे पुतणा-मावशीचं प्रेम आहे. त्यामुळे यांच्यापासून सावध होण्याची गरज आहे.

    फडणवीसांच्या भाषणातील ठळक मुद्दे…

    मराठी माणसाच्या नाही, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई- फडणवीस

    मराठी माणसाच्या अस्तित्वाची नाही तर त्यांच्या अस्तित्वाची लढाई. आणि तुम्हीच म्हणजे मराठी, तुम्ही म्हणजे मराठी आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. समोर बसलेली ही जनता म्हणजे मराठी आणि महाराष्ट्र आहे.

    काल काही लोकांनी माझीच नक्कल केली. पण त्यांना समजायला पाहिजे की नक्कल करता करता काकांची काय परिस्थिती झाली. पण काकांना किमान नक्कल तरी करता येते. पण तुमची काय अवस्था होईल.

    आधी म्हणायचे की हिंदी सक्तीसाठी आम्ही एकत्र आलो अन् आता काय तर आम्ही मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र आलो. या राज्यात हिंदी सक्ती करणारे कोण? २१ सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्रावर माशेलकर समिती तयार झाली. या समितीत उबाठाचे नेते, विजय कदम देखील होते. या समितीत १८ लोक मराठी होते. आता या समितीचा अहवाल सर्वांनी पाहिला. पान नंबर ५६ वर भाषेकरिता उपगट केला. त्यात उबाठाचे नेते विजय कदम होते. त्यात ‘इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी’ असे नमूद केले होते. हा अहवाल उद्धव ठाकरे यांच्या काळातील आहे.

    तुझको मिर्ची लगी तो…

    फडणवीस म्हणाले- मुंबईच्या विमानतळावर एकच धावपट्टी होती, जागा कमी पडत होती. म्हणूनच नवी मुंबईत नवीन विमानतळ केलं. पण तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू. अरे पण आत्ताच सांगतो की, आता तिसरं विमानतळही करणार आहे. जर लंडनला तीन विमानतळ असू शकतात, तर मुंबईत का नाही.

    विकासावर बोलायचे असेल तर मर्द बनावे लागते..

    विकासावर बोलायचे असेल तर मर्द बनावे लागते. माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात, अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. मी त्या बापाचा पोरगा आहे, ज्याने त्याचे जीवन संघर्षात कमावले, मी त्या बापाचा पोरगा आहे ज्याने संघाचे काम केले. पण तुमचे पिताश्री जेव्हा स्वर्गातून बघत असतील तेव्हा आपला मुलगा रशीद मामू सोबत बसला आहे, तेव्हा काय वाटेल त्यांना?

    गुंतवणूकदार बोलावले नाही तर रोजगार कोण देणार?

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, रोज मोदींना शिव्या देणाऱ्या दीदी यांनी पण अदानीला बोलावले होते. केरळमध्ये तर कम्युनिस्ट, कॉंग्रेस, ज्या ठिकाणी भगव्याला शिरू पण देत नाहीत, तिथे सुद्धा अदानीला बोलावून गुंतवणूक घेतली. आंध्र प्रदेशमध्ये पण गुंतवणूक घेतली. तमिळनाडूमध्ये स्टॅलिन साहेबांना 15 हजार 500 कोटींची गुंतवणूक घेतली आहे. आता मला सांगा हे सगळे वेडे आहेत? अरे बाबा आपण कुठल्या जमान्यात आहोत? तुम्ही जर गुंतावुक नाकारली, तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे, इथे रोजगार कसा मिळणार? वडापावच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वप्न बघितले नाही. पण आम्ही स्वप्न बघितले आहे. यासाठी अदानी असो किंवा कोणी असो आम्ही त्यांचे स्वागत करू. आमचे ठरले आहे की आम्ही कोणालाही गैरफायदा घेऊ देणार नाही.

    कफनचोरांना जेलमध्ये पाठवणार

    टाटा ग्रुपचा रेविन्यू किती वाढला 664 टक्क्यांनी, अदानी ग्रुपचे 680 टक्क्यांनी, आदित्य बिर्ला ग्रुपचे 566 टक्के, सनफार्मा आपल्या मुंबईची कंपनी आहे, यांचा 1552 टक्क्यांनी वाढला आहे. गोदरेजचा 409 टक्के, आता या सगळ्यांचे वाढले आहेत, त्याच्या तुलनेत त्यांनी सांगितलेला आकडा कमीच आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तुम्हाला चिंता नाही, मला चिंता आहे, त्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणांची. त्यांना इथे गुंतवणूक हवी आहे. मी एवढेच सांगायला आलो आहे, आमचा संकल्प एकच आहे, या मुंबईत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. पारदर्शी प्रमाणिकतेमधून आम्हाला काम करायचे आहे. कफनचोरांना जेलमध्ये पाठवून मुंबईत मुंबईकरांचे हक्काचे सरकार या मुंबईत बसवण्यासाठी आलो आहोत.

    जिसे निभा न सकु, ऐसा वादा नही करता, में अपनी बाते औकातसे ज्यादा नहीं करता, भलेही तमन्ना रखता हू आसमान छु लेने की, लेकिन औरो को गिरानेका इरादा नही रखता.. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण संपवले.

    Fadnavis Shinde Rally Shivaji Park Mumbai Power Warning Photos VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुंबई म्हणजे तुम्ही नाही, असे ठाकरेंना म्हणणारे फडणवीस पश्चिम महाराष्ट्र सोडा, पुणे जिल्हा म्हणजे सुद्धा तुम्ही नाही; असे पवारांना केव्हा म्हणणार??

    20 वर्षांपूर्वी वेगळे झालात, त्यावेळी काय महाराष्ट्र छोटा होता का??; तुम्ही स्वार्थासाठी एकत्र आलात; ठाकरे बंधूंना एकनाथ शिंदेंचा टोला!!

    व्यंगचित्रकारांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली; म्हणे, अदानी कंपनीच्या प्रचाराचीच दिली फुल्ल टू गॅरेंटी!!