‘’त्यांच्या मनात काय आहे ते…’’ असंही फडणवीसांनी पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज पत्रकारपरिषद घेत मोठा निर्णय जाहीर केला. दोन महिने राजकारणातून ब्रेक घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. शिवाय, पंकजा मुंडे आता राजकारणातूनच सन्यास घेणार की काय? असंही बोललं जात आहे. पंकजा मुंडेच्या या निर्णायावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Fadnavis reaction on Pankaja Mundes decision to take a break from politics
ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवसेना भवनात शिवसेनेत(शिंदे गट) प्रवेश केला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत फडणवीस बोलत होते.
यावेळी पंकजा मुंडेच्या निर्णयाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी सांगितले की, ‘’पंकजा मुंडे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्या आमच्या पक्षाच्या एक ज्येष्ठ नेत्या आहेत. आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की, दोन महिने त्या सुट्टी घेणार आहेत. आम्ही त्यांच्याशी संवाद करू, त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेऊ.’’
याचबरोबर ‘’शक्यता आहे की, आज समजा आमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस आलं, तर आमच्या पक्षातील काही लोकांचा त्यांच्याशी संघर्ष होता. सगळ्यानांच ते एकदम रूचेल पटेल आवडेल, सगळेच स्वागत करतील, असं आम्हीही समजत नाही आणि आमच्यासोबत आलेलेही समजत नाहीत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत संवादातून मार्ग निघत असतो. भाजपाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी संवाद साधतील.’’ असंही यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या? –
“मला राजकारणातून ब्रेक हवा आहे. सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत आहे. मी गेल्या २० वर्षांत सुट्टी घेतलेली नाही. मला एक-दोन महिने सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.” असं पंकजा मुंडे पत्रकारपरिषदेत म्हणाल्या आहेत.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या कायमच चर्चा सुरू असतात. एवढंच नाहीतर त्या भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या वावड्या अनेकदा उठल्याचे आपण आतापर्यंत पाहिले आहे. मात्र वेळोवेळी पंकजा मुंडे यांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
Fadnavis reaction on Pankaja Mundes decision to take a break from politics
महत्वाच्या बातम्या
- मणिपूरमध्ये २४ बंकर उध्वस्त; डोंगर-दऱ्यांमध्ये शोधमोहीम सुरू, ३५२ जण ताब्यात!
- पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल
- ‘’अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केल्याचे का कळवले नाही?’’; शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल!
- पुण्यातील धक्कादायक घटना : मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV, शाळेत शिक्षणाच्या नावाखाली ख्रिश्चन धर्माचा प्रचार?