विशेष प्रतिनिधी
मुंबई : Fadnavis शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे भरपाईचे पॅकेज आणि कर्जमाफीची मागणी, या सर्वांवर विरोधक सरकारला घेरत असतानाच फडणवीस यांनी कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.Fadnavis
मराठवाड्यात मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली आणि अनेक भागामध्ये शेतजमिनी, पिके, गुरेढोरे वाहून गेली. या अनपेक्षित आपत्तीमुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले. राज्य सरकारने नुकसानभरपाईसाठी पॅकेज जाहीर केले असले तरी ते अत्यल्प असून शेतकऱ्यांच्या दु:खाला न्याय देणारे नाही, अशी टीका विरोधकांनी केली. उद्धव ठाकरे स्वतः मराठवाड्यात दौऱ्यावर गेले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारची पहिल्या टप्प्यातील मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का, याचा आढावा घेत सरकारवर तीव्र टीका केली. तसेच आमच्या सरकारने सर्वसमावेशक कर्जमाफी केली होती, याच धर्तीवर या सरकारनेही तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.Fadnavis
याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना कर्जमाफीबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले की, कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे. आम्ही ती महत्त्वाचीच मानतो. पण कर्जमाफी हे शेती समस्येचं अंतिम उत्तर नाही. यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो, पण भविष्यातील संकट टळत नाही. फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मिशननुसार राज्यातील 25 हजार हेक्टर शेती नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी बियाणे कंपन्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शेती शाश्वत झाली पाहिजे – फडणवीस
कर्जमाफीच्या चर्चेपलीकडे जाऊन फडणवीस यांनी शेतीमधील शाश्वततेवर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, अंतिम उपाय म्हणजे शेतीमध्ये शाश्वतता आणणे. उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, तेव्हाच शेतकऱ्यांची खरी प्रगती होईल. त्यांनी सांगितले की शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट प्रकल्प आणि आधुनिक पद्धतींचा वापर हा काळाचा गरज असून याच माध्यमातून शेती नफ्यात आणता येईल. मराठवाड्यातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा मुद्दा विशेषत्वाने मांडला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी त्यांना विनम्र अभिवादनही केले.
कर्जमाफीच्या वेळेबाबतचे विवादित वक्तव्य पुन्हा चर्चेत
फडणवीस यांचे काही दिवसांपूर्वीचे एक वक्तव्यही पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटले होते की, जूनमध्ये कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार नाही. सध्या कर्जमाफी केली तर बँका जास्त लाभात जातील. या विधानावरून विरोधकांनी त्यांची जोरदार टीका केली होती. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा बँकांचा विचार केला जातोय का? असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यातच आता दिलेले नवे विधान पाहता फडणवीस कर्जमाफीबाबत सावध भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होते.
पालघर साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपत – भूमिका केली स्पष्ट
पालघर प्रकरणातील आरोपीचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असल्याचा आरोप केला जात आहे. याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. या संदर्भात फडणवीस म्हणाले की, मी संपूर्ण माहिती घेतली आहे. जोपर्यंत ते त्यांच्यासोबत होते, तो पर्यंत आरोप झाले नाहीत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच आरोप करण्यात येत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घेतलेला हा निर्णय असला तरी देखील त्यांनी सर्व शहानिशा करून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
डबेवाला संघटनेचा पाठिंबा आमच्यासाठी माऊलींचा आशीर्वाद
डबेवाला संघटनेचे आभार मानता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक देखील केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अभ्यास केला जातो. डबेवाल्यांच्या घराचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. श्रीकांत भारतीया यांनी आंतरराष्ट्रीय केंद्र देखील सुरू केले. त्यामुळे त्यांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर निर्माण झाला आहे. या डबेवाल्यांमध्ये सर्व माळकरी आणि वारकरी आहेत. अतिशय सहकारी लोक आहेत. त्यांचा पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना राजकारणात ओढू इच्छित नाही. मात्र त्यांचा पाठींबा आमच्यासाठी माऊलींचा आशीर्वाद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला भवितव्य नसल्याची टीका
काँग्रेसने स्वबळावर निवडून लढवली किंवा आघाडीत लढले तर त्याचा फार परिणाम होणार नाही. जोपर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व हे भारताच्या मतदारांची नाडी समजून घेत नाही. भारताच्या मतदारांची मानसिकता समजून घेत नाही. जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांचे राजकारण करत नाही. ते केवळ सोशल मीडियाचे हवेतला राजकारण करतील, तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नसल्याची टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Fadnavis Loan Waiver Not Final Answer Natural Farming Marathwada Rain Damage Photos Videos Statement
महत्वाच्या बातम्या
- मोठा दिलासा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’
- Nitish Kumar : नितीश कुमार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानावर शपथ घेणार; BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री
- येवल्यात भुजबळांशी युती, बारामतीत अजितदादांशी फाईट; भाजपने केली राष्ट्रवादीची हवा टाईट!!