प्रतिनिधी
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन केलेल्या भाषणातषलाल किल्ल्यावरून जनतेला पुन्हा आशीर्वाद मागितले. या मुद्द्यावरून अनेकांना देवेंद्र फडणवीस यांचा “मी पुन्हा येईन”, या वक्तव्याची आठवण झाली. या मुद्द्यावरून शरद पवारांनी फडणवीस आणि मोदींना डिवचले. देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतल्या शासन माझ्या दारी कार्यक्रमात पवारांना त्यावरून उत्तर दिले आहे. मी पुन्हा आल्याची अनेकांच्या मनात आजही दहशत आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांना संबोधत शरद पवारांना टोला हाणला. Fadnavis lashed out in front of Ajit Dada in Shirdi event
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणात 2024 च्या 15 ऑगस्ट कार्यक्रमात आपलेच भाषण लाल किल्ल्यावरून होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यासाठी त्यांनी जनतेकडे आशीर्वाद मागितले होते. या मुद्द्यावरून मोदींवर टीका करताना शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या “मी पुन्हा येईन”, या घोषणेची खिल्ली उडवली होती. फडणवीस पुन्हा आले, पण ते उपमुख्यमंत्री म्हणून आले. आता मोदी कोणत्या पदावर येतील ही माहिती नाही, असा चिमटा शरद पवारांनी काढला होता. त्यावर आज फडणवीसांनी अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवारांना प्रतिचिमटा काढला.
फडणवीस म्हणाले, की दादा मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. त्याची दहशत आजही अनेकांच्या मनात आहे. मी पुन्हा आलो होतो. जनतेने आम्हाला कौल दिला होता. पण काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे 2019 मध्ये मी पुन्हा येऊ शकलो नाही. पण नंतर जेव्हा आलो, तेव्हा बेईमानी करणाऱ्यांचा सगळा पक्ष घेऊन आलो आणि तुम्हालाही घेऊन आलो, अशा शब्दांत फडणवीस यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले.
शिर्डीतील शासन माझ्या दारी कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 24 लाख लाभार्थ्यांना सुमारे 3500 कोटींचे लाभ दिल्याचे फडणवीस यांनी या कार्यक्रमाला आवर्जून नमूद केले.
Fadnavis lashed out in front of Ajit Dada in Shirdi event
महत्वाच्या बातम्या
- ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘सबवे’ नंतर आता ‘बर्गर किंग’ देखील मेनूकार्ड मधून टोमॅटो गेले गायब!
- ”कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना..” राज ठाकरेंचा संताप!
- राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार आणि अजित पवार गटाला नोटीस, उत्तरासाठी तीन आठवड्यांची मुदत
- मीडिया पर्सेप्शन पलीकडले भाजपचे ग्राउंड वर्क सुरू; महाराष्ट्राचे 40 आमदार ट्रेनिंगसाठी जाणार मध्य प्रदेशात!!