• Download App
    Fadnavis government फडणवीस सरकारची कारवाई वाळू माफियांवर; मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली जरांगेंची आगपाखड फडणवीसांवर!!

    फडणवीस सरकारची कारवाई वाळू माफियांवर; मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली जरांगेंची आगपाखड फडणवीसांवर!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने कायदेशीर कारवाई केली वाळू माफियांवर; पण मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी आग पाखड केली देवेंद्र फडणवीसांवर!!Fadnavis government

    या सगळ्यात मनोज जरांगे यांचा सख्खा मेव्हणाच वाळू माफिया निघाला, त्याने जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात भाग घेतला होता, हे विशेष. त्यामुळेच जरांगे यांनी आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली सरकारने केलेल्या कायदेशीर कारवाईवर आक्षेप नोंदविला. जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर आगपाखड केली.

    त्याचे झाले असे :

    बीड जिल्हा आणि मराठवाड्यातले गुन्हेगारीचे बंड मोडण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्टिव्हेट झाले. मनोज जरांगे यांचा सख्खा मेव्हणा वाळू माफिया विलास खेडकर याच्यासह नऊ जणांवर पोलिसांनी मराठवाड्यातून तडीपारचा बडगा उगारला. या ९ वाळू माफियांपैकी ६ वाळू माफिया मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात आघाडीवर होते. त्यांच्यावर 2019 पासून वेगवेगळे गुन्हे दाखल होते. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली ते गुन्हे दडपण्यात हे सगळे वाळू माफिया आणि गुन्हेगार आत्तापर्यंत यशस्वी झाले होते. परंतु आता पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करून या सगळ्यांना तडीपार केले. या सगळ्या वाळू माफिया, गुन्हेगारांवर बीड जालना परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमधून तडीपारी लागू असेल.

    मनोज जरांगे यांचा सख्खा मेव्हणा विलास खेडकर याच्या विरोधात वाळू चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. यापैकी अवैध वाळू वाहतुकीचा गुन्हा 2021 मध्ये दाखल झाला. 2023 मध्ये सुरुवातीला 100 ब्रास वाळूची चोरी आणि नंतर 500 ब्रास वाळूची चोरी याबद्दलही गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे गोंदी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्याने पाथरवाला बुद्रुक मधून 500 ब्रास वाळूची चोरी केली होती.

    विलास खेडकर याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली त्याचबरोबर वामन मसूरराव तौर, रामदास मसूरराव तौर, संदीप सुखदेव लोहोकरे, गोरख बबनराव कुरणकर, अमोल केशव पंडित, केशव माधव वायभट, गजानन गणपत सोळंके, सुयोग मधुकर सोळंके या सगळ्यांवर तडीपरीची कारवाई करण्यात आली आहे.

    – मनोज जरांगेंनी आगपाखड

    आपला सख्खा मेव्हणा वाळू माफिया विलास खेडकर याला तडीपरीची नोटीस आल्याबरोबर मनोज जरांगे यांनी फडणवीस सरकारवर आगपाखड केली. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना नोटीस गेली, तर त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. त्यांना मराठा समाज देत असलेला सन्मान विसरावा लागेल, असा दम मनोज जरांगे यांनी भरला.

    – फडणवीस यांची प्रतिक्रिया

    पण जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर जरी आगपाखड केली, त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुणी कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कायदेशीर कारवाई होत नाही. गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई होते. नेमक्या कोणाला तडीपरीच्या नोटिसा गेल्यात, या संदर्भात तपशीलवार माहिती घेऊन नंतर बोलता येईल.

    Fadnavis government’s action against sand mafia

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!