विशेष प्रतिनिधी
नागपूर : मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.Fadnavis gave proof of Karseva by sharing photo!!
पहिल्या कारसेवेला 20व्या वर्षी गेलो होतो. त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये 18 दिवस होतो. दुसऱ्या कारसेवेच्यावेळी जेव्हा कलंकित ढाचा खाली आला तेव्हा मी तिथेच होतो, असे फडणवीसांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले होते. तसेच अटलजींच्या काळात तिसरी कारसेवा झाली तेव्हाही मी तिथे होतो. कारण मी कारसेवक आहे, राम सेवक आहे, असे उपमुख्यमंत्री सांगतात. माझा महत्त्वाचा परिचय रामसेवक आणि कारसेवक म्हणून आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी नागपूरहून प्रकाशित होणार्या दै. नवभारतचे आभार मानले आहेत. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र त्यांनी शेअर केले आहे. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
Fadnavis gave proof of Karseva by sharing photo!!
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरी मुस्लिमांकडून श्री रामलल्लांच्या सेवेसाठी 2 किलो ऑरगॅनिक केशर; अभिषेकासाठी अफगाणिस्तानच्या नदीतूनही आले पाणी!!
- सानिया मिर्झाला सोडून शोएब मलिकने केले तिसरे लग्न
- मराठा समाजाचे मागासलेपण सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी पासून युध्दपातळीवर; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
- मनीलाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी हेमंत सोरेनची घरी पोहचली EDची टीम