प्रतिनिधी
मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टार्गेट केले.Fadnavis’ direct reply on Maratha reservation before Jarange Patal’s speech; Who gave the reservation?? And someone said this!!
मराठा आरक्षणासाठी दिलेली 30 दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे. आता फक्त 10 दिवस उरले आहेत. सरकारने ताबडतोब आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. शिंदे – फडणवीस आणि पवार हे मराठा समाजाला उचकवत आहेत. त्यासाठी त्यांनी छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांना मराठा समाजावर सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्तेंना आवरावे, असा इशारा जरांगे पाटलांनी अंतरवलीतल्या सभेत दिला.
पण जरांगे पाटलांचे भाषण होण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी इथल्या ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी नेमके काय उद्गार काढले होते?, त्याचा व्हिडिओ भाजपने जरांगे पाटलांच्या भाषणानंतर ट्विट केला. मराठा समाजाला आरक्षण नेमके दिले कुणी?? आणि घालवले कुणी?? याचे तपशीलच देवेंद्र फडणवीस यांनी त्या भाषणात उलगडून सांगितलेत. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी न्याय आहे. आमच्या सरकारच्या काळात ते आरक्षण आम्ही दिले होते आणि हायकोर्टापर्यंत टिकवूनही दाखवले होते. पण ठाकरे – पवार सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकले नव्हते, अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. फडणवीसांच्या त्या भाषणाचा हा व्हिडिओ भाजपने आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केला आहे.
जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात गुणरत्न सदावर्ते यांना आवरावे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट जरूर केले, पण फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते, ते ठाकरे – पवार सरकारच्या काळात गेले, याविषयी कोणतेही उद्गार काढले नव्हते. मात्र, भाजपने फडणवीस यांच्या भाषणाचाच नेमका व्हिडिओ ट्विट करून जरांगे पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.
Fadnavis’ direct reply on Maratha reservation before Jarange Patal’s speech; Who gave the reservation?? And someone said this!!
महत्वाच्या बातम्या
- हमासच्या हल्ल्याचा मध्यपूर्वेत मोठा परिणाम, सौदी अरेबिया आणि इराण आले जवळ, इस्रायलशी थांबली चर्चा!
- जम्मू-काश्मिरात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ निदर्शने; अमेरिका आणि इस्रायलविरोधात घोषणाबाजी
- शिंदे – फडणवीस – अजितदादांना टार्गेट करत जरांगे पाटलांचे भुजबळ, सदावर्तेंवर शरसंधान; पण प्रस्थापित मराठा नेतृत्वालाच खरे आव्हान!!
- भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के, जाणून घ्या तीव्रता