विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Fadnavis काँग्रेसच्या डोक्यात पाकिस्तानचा व्हायरस शिरला आहे. त्यामुळे देशाला पाकव्याप्त काश्मीरपासून नव्हे तर पाक विचाराच्या काँग्रेसचा मोठा धोका आहे, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी काँग्रेसवर निशाणा साधताना केला. भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला दाखवून दिले, असेही ते यावेळी म्हणाले.Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटींहून अधिक रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी व लोकार्पण झाले. यावेळी आयोजित सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर उपरोक्त टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले, भारताकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर घुसून मारले जाईल हे भारतीय सैन्य व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी सिंदूर लावून आल्या आहेत. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी आपल्या 27 भावांना ठार केले. त्यानंतर मोदींनी या सर्वांना मातीत मिसळण्याची ग्वाही दिली. त्यानुसार भारताने अवघ्या 23 मिनिटांमध्ये पाकमध्ये घुसून अतिरेक्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले.
या कारवाईत मसूद अजहर व हाफीज सईद या कुख्यात अतिरेक्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह 100 जणांचा खात्मा केला. या घटनेनंतर पाकने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकने मोठ्या प्रमाणात ड्रोन पाठवले. पण त्यांच्या एकाही ड्रोनला आमच्यावर हल्ला करू शकला नाही. त्यांचे 500 हून अधिक ड्रोन आपल्या सैन्याने हवेतच उडवले. त्यांनी त्यांचे क्षेपणास्त्र पाठवले. पण ते ही आपल्या सैन्याने पाडले. त्यानंतर पाकने भारतापुढे गुडघे टेकत शस्त्रसंधी केली. या युद्धात मेड इन इंडिया सामग्री हे सर्वात मोठे यश ठरले.
काँग्रेसची मानसिकता पाकने हायजॅक केली
ते पुढे म्हणाले, एक राहुल (आमदार राहुल आवाडे) अडीच किलोमीटर तिरंगा यात्रा काढतो, तर दुसरा राहुल (राहुल गांधी) विमाने कशी पाडली? हल्ले कसे झाले? असे विचारतो. आतापर्यंत मी पाकव्याप्त काश्मीर ऐकले होते. पण जीवनात पहिल्यांदा लक्षात आले की, आपल्याला केवळ पाकव्याप्त काश्मीरचा धोका नाही, तर पाकव्याप्त काँग्रेस हा आता नवा धोका निर्माण झाला आहे. कारण, या काँग्रेसच्या लोकांची सगळी मानसिकता ही पाकिस्तानी लोकांनी हायजॅक केली आहे. जे प्रश्न पाकने विचारले पाहिजे, ते प्रश्न आता राहुल गांधी व त्यांचे चेलेचपाटे विचारत आहेत. किती ड्रोन पाडले? विचारत आहेत.
या मूर्खांना समजावणार तरी कसे?
एकाने तर वेगळाच शोध लावला. तो म्हणाला, पाकने 15 हजारांचे चिनी ड्रोन पाठवले होते, तुम्ही त्याला पाडण्यासाठी 15 लाखांचे क्षेपणास्त्र कसे पाठवले? आता या मूर्खांना शेतीचे ड्रोन व युद्धाचे ड्रोन यातला फरकही माहिती नाही. शेतीत फवारणीसाठी वापरला जाणारा ड्रोन हा युद्धावर पाठवला जात नाही. पण मूर्खांना समजावणार कोण? आणि त्यासाठी मिसाईल डागावे लागत नाही. त्यासाठी अँटी ड्रोन गन वापरल्या जातात. एकाचवेळी 64 ड्रोनवर मारा करणारी ड्रोन विरोधी गन केवळ आपल्याकडेच आहे, ती अमेरिकेकडेही नाही हे मला सांगताना अभिमान वाटत आहे, असे फडणवीस म्हणाले.
Fadnavis’ counterattack on Congress; Pakistan virus in their head
महत्वाच्या बातम्या
- Muhammad Yunus : बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस राजीनामा देण्याच्या तयारीत!
- Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग
- Pakistan : पाकिस्तानचा आता नेपाळमार्गे भारतात घुसरखोरीचा प्रयत्न
- Nishikant Dubeys : भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर, म्हणाले…