• Download App
    Baramati & Rahuri Bypolls Should Be Unopposed: CM Devendra Fadnavis VIDEOS मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा

    CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा

    CM Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    अहिल्यानगर : CM Devendra Fadnavis बारामती आणि राहुरी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमची इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. पण जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.CM Devendra Fadnavis

    दुसरीकडे मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या गाडीवरील लाल-निळ्या दिव्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली. गाडीवर लाल दिवा नव्हता, तर बोनेटच्या ठिकाणी तो लावलेला होता. यात महापौरांचा कोणताही दोष नाही. नियम सर्वांना माहित आहेत, पण त्यांना विनाकारण टार्गेट करणे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.CM Devendra Fadnavis



    अजून बरेच काम करायचे बाकी

    महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39 व्या पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद पदवी) प्रदान करण्यात आली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जेव्हा मला या पदवीबाबत विचारणा झाली, तेव्हा मनात संभ्रम होता. कारण कृषी क्षेत्रात अजून बरेच काम करायचे बाकी आहे. मात्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठासारख्या नामांकित संस्थेचा आदर राखण्यासाठी मी ही पदवी स्वीकारली.

    14 हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट

    राज्यातील कृषी स्थितीवर बोलताना फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘सोलर योजना’ यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. या वर्षाअखेरपर्यंत 14 हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच, हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी 10 हजार गावांमध्ये ‘क्लायमेट प्रूफ’ शेती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

    Baramati & Rahuri Bypolls Should Be Unopposed: CM Devendra Fadnavis VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahuri Assembly : बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर; 23 एप्रिलला मतदान, तर 4 मे रोजी निकाल

    मेट्रो भवनाचे उदघाटन, पुणे मेट्रोच्या नियंत्रण आणि वेगाला नवे केंद्र; प्रवाशांची संख्या अडीच लाख पार!!

    Chhagan Bhujbal : राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे स्पष्टीकरण- राज्यात LPGचा कोणताही तुटवडा नाही; गॅस, इंधन तुटवड्याच्या फक्त अफवा अन् संभ्रम