विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर :Fadnavis विरोधक हे सातत्याने आरोप करतात, पण कोर्ट जेव्हा त्यांना पुरावे मागते, तेव्हा ते देत नाहीत. निवडणूक आयोग देखील त्यांना पुरावे मागतो, पण एक पुराव देखील विरोधक देऊ शकत नाहीत. हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, मात्र अजुनही ते सुधरले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांची अशाच प्रकारची माती होणार असल्याचे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.Fadnavis
छत्रपती संभाजीनगर शहरात आज भाजपच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे कार्यालय मराठवाडा विभागासाठी असणार आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.Fadnavis
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. मी विशेष उल्लेख आणि अभिनंदन मंत्री अतुल सावे यांचे करू इच्छितो. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालय उभारताना अतिशय मोलाची भूमिका बजावली. जमीन शोधण्यापासून ते कार्यालयाची इमारत उभी राहण्यापर्यंत सातत्याने येणाऱ्या अडचणींचा सामना अतुल सावे यांनी केला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाजन, मुंडे स्वर्गातून आशीर्वाद देत असतील
आपले नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरवर प्रचंड प्रेम होते. भाजपच्या वाटचालीत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, वसंतराव भागवत या सगळ्या लोकांनी सातत्याने आपली कार्यालये झाली पाहिजेत, पक्षाला स्थैर्य आले पाहिजे, यासाठी त्या काळात खूप प्रयत्न केले. त्याकाळची आपली परिस्थिती आणि पद्धतीनुसार जसे मिळतील तसे कार्यालये त्या काळात उभे केले आणि पक्षाला चालवले. कुठे नाही उभे राहू शकले, तर किरायाच्या जागेवरून पक्ष चालवला. पण आपली कार्यालये चांगली असली पाहिजेत, असे त्याकाळी आपले स्वप्न होते. आता प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे स्वर्गातून आपल्याला आशीर्वाद देत असतील, असे फडणवीस म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय व्हावे ही शहांची इच्छा
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, २०१४ साली आपले सरकार आल्यानंतर देशामध्ये अमित शहा यांनी भाजपची जबाबदारी घेतली. त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे प्रशस्त कार्यालय झाले पाहिजे, अशी इच्छा अमित शहांनी बोलून दाखवली आणि त्यासाठी प्रयत्न सुरू करा, असे अमित शहांनी आम्हाला सांगितले, असे फडणवीस म्हणाले. तेव्हापासून प्रत्येक जिल्ह्यात जमीन खरेदी करणे, प्लॅन मंजूर करणे, कार्यालय उभे करण्याचे आपले कार्य सुरू आहे. कुठेही सरकारी जमिनी घ्यायच्या नाहीत, अनधिकृत बांधकाम करायचे नाही, शंभर टक्के परवानग्या घेऊनच भाजपचे कार्यालय तयार झाले पाहिजे, हे तत्त्व आपण पाळले.
भाजपचे विभागीय कार्यालय कसे आहे?
छत्रपती संभाजीनगर येथील शहर आणि जिल्ह्याचे कार्यालय असले, तरी ते विभागाचे देखील कार्यालय असणार आहे. या कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारे काम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या केबिन्स आहेत. माध्यमांसाठी सुसज्जित हॉल आहे. दोन मोठे हॉल आहेत. छत्रपती संभाजीनगरला प्रदेश कार्यकारणी करायची असेल, तर या कार्यालयात होऊ शकते, एवढी व्यवस्था या कार्यालयात आहे. विभागीय बैठकी या ठिकाणी होऊ शकतात. या ठिकाणी बोर्ड रूम देखील आहे. सर्व सुविधांनी युक्त अशा प्रकारचे उत्तम कार्यालय तयार केले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Fadnavis Attacks Opposition Air Firing Local Elections Defeat Photos Videos Speech
महत्वाच्या बातम्या
- वसंतराव नाईक यांचा वारसा काँग्रेसने सोडला, भाजपने घेतला; पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही बडा नेता नाही फिरकला!!
- India Russia : रशियन कच्च्या तेलाचा भारत दुसरा सर्वात मोठा खरेदीदार; ऑक्टोबरमध्ये ₹22.17 हजार कोटींची आयात झाल
- Al-Falah University : अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध दिल्लीत 2 FIR; स्फोटानंतर फरिदाबादमधील मशिदींमध्ये तपासणी
- OBC reservation : ओबीसींना कमी आरक्षण मिळाले; OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांचा इलेक्शन कमिशनवर आरोप, कोर्टात जाण्याचा इशारा