विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील बदली घोटाळा प्रकरणात सगळे कसे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रिप्ट नुसार घडताना दिसत आहे…!! विधानसभेत पहिला पेन ड्राइव्ह बॉम फोडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की सरकारने बदली घोटाळा प्रकरणाची चौकशी आणि मी दिलेले पुरावे सीबीआयकडे सोपवावेत. पण सरकार तसे करणार नसेल तर आम्ही न्यायालयात जाऊ. त्याच पद्धतीने आज ठाकरे – पवार सरकारने देवेंद्र फडणवीस यांची बदली घोटाळा प्रकरणातली सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली.Fadanavis Pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan’s wicket; Fadnavis to go to High Court for CBI inquiry
आठवडाभरात हायकोर्टात
त्यामुळे अर्थातच देवेंद्र फडणवीस त्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे मुंबई हायकोर्टात येत्या आठवडाभरात जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी गेल्या तीन दिवसाच्या घडामोडींनंतर ज्यांच्या कार्यालयामध्ये हे स्टिंग ऑपरेशन झाले ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. ही माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात झालेल्या स्टिंग ऑपरेशनचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याबद्दल प्रवीण चव्हाण यांनी पहिल्या दिवशी खुलासा केला.
परंतु, त्यानंतर ते तीन दिवस गायब होते त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन कोणी केले याचा खुलासा नंतर एबीपी माझाशी बोलताना केला होता. आपला अशील तेजस मोरे याने आपल्या कार्यालयातील भिंतीच्या भिंतीवरच्या घड्याळाचा छुपा कॅमेरा बसून स्टिंग ऑपरेशन केल्याचा त्यांनी दावा केला होता.
तेजस मोरेने दावा फेटाळला
मात्र, तेजस मोरे याने समोर येऊन हा संपूर्ण दावा खोडून काढला. उलट मी स्टिंग ऑपरेशन केले असेल तर प्रवीण चव्हाण यांनी तर त्याचे पुरावे द्यावेत, असाही पलटवार तेजस मोरे यांनी केला होता. मात्र त्यावर प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांचे आरोप फेटाळून लावले पण आज अखेर त्यांनी सरकारी वकील पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली.
पहिली विकेट काढण्यात फडणवीस यशस्वी
याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह प्रकरणात पहिली विकेट काढल्याचे स्पष्ट झाले. माझ्याकडे पेन ड्राइव व्यतिरिक्त अन्य महत्त्वाचे पुरावे आहेत. ते मी हाय कोर्टात देईन अथवा सीबीआयकडे सोपवा, असे फडणवीस यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे एक प्रकारे फडणवीस यांनी पहिल्या राउंडमध्ये ठाकरे – पवार सरकारवर मात केल्याचे स्पष्ट झाले.
Fadanavis Pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan’s wicket; Fadnavis to go to High Court for CBI inquiry
महत्त्वाच्या बातम्या
- महानगरपालिकेच्या प्रभाग रचना रद्द
- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, काँग्रेसच्या 2 नवनिर्वाचित नगरसेवकांची गोळ्या झाडून हत्या
- GREAT INDIA : स्टीव्ह वॉने मित्राची शेवटची इच्छा केली पूर्ण ! हिंदू मान्यतेनुसार अस्थिचं वाराणसीत विसर्जन…
- Maharashtra Budget 2022 : शिवसेनेच्या आमदारांची तक्रार खरीच, अर्थसंकल्पात राष्ट्रवादीच्या वाट्याला तब्बल ५७ % निधी, फडणवीसांनी काढले वाभाडे