• Download App
    आमने-सामने : पवार म्हणतात हे सरकार पाडणार 'किसीमे इतना दम नहीं' ; पाटील म्हणतात 'हम किसीसे कम नहीं!'।Face to face: Pawar says this government will be overthrown; Patil says 'We are no less than anyone!'

    आमने-सामने : पवार म्हणतात हे सरकार पाडणार ‘किसीमे इतना दम नहीं’ ; पाटील म्हणतात ‘हम किसीसे कम नहीं!’

    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची फटकेबाजी सुरूच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे,’ असं विधान केलं यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ‘महाराष्ट्रात बेबंदशाही नाही, आम्हीपण पाटील आहोत,’ असा टोला लगावला आहे. Face to face: Pawar says this government will be overthrown; Patil says ‘We are no less than anyone!’

    महाविकास आघाडी सरकार म्हणजे खेळ वाटला का? हे सरकार पाडणारे मूल अद्याप जन्माला आलेले नाही; असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. यानंतर त्यांचा खरपूस समाचार घेत चंद्रकांत पाटील म्हणाले की आम्हालापण बोलता येतं !



    अजित पवारांची अनेक प्रकरणांमध्ये अजून चौकशी व्हायची आहे. पराभवाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यांना पराभव समोर दिसू लागल्यानेच अजित पवार अशी बेताल वक्तव्य करत आहेत.

    पवारांनी इतका अहंकार बाळगू नये. हम किसी को टोकेंगे, तो छोडेंगे भी नही, असे म्हणत सरकार कधी बदलायचं ते आम्ही बघू, असा सूचक इशारा ही त्यांनी दिला.

    त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एका चंद्रकांत पाटील यांचा ‘चंपा’ असा उल्लेख केला आहे. याबाबत, आता चंद्रकांत पाटील कडाडून आक्षेप नोंदवत अजित पवार यांना थेट इशारा दिला अजित पवार यांना इशारा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे.

    खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेल असं सांगितलं होतं. मात्र, आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत ते मला करावे लागतील. अगदी त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील’.

    Face to face: Pawar says this government will be overthrown; Patil says ‘We are no less than anyone!’

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस