• Download App
    आमने-सामने : लस प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांना नियम शिकवणार्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांना भाजपच्या विजया रहाटकर यांनी दाखवला आरसा।Face to face: BJP's Vijaya Rahatkar shows mirror to Shiv Sena's Priyanka Chaturvedi who taught Devendra Fadnavis rules on vaccine issue

    आमने-सामने : लस प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांना नियम शिकवणाऱ्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांना भाजपच्या विजया रहाटकर यांनी दाखवला आरसा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्या तन्मय फडणवीस यांने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. Face to face: BJP’s Vijaya Rahatkar shows mirror to Shiv Sena’s Priyanka Chaturvedi who taught Devendra Fadnavis rules on vaccine issue



    मात्र त्यांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी एका ट्विटने रोखून धरले. रहाटकर यांच्या ट्विट नंतर अनेकांनी रिट्विट करत प्रियंका चतुर्वेदी यांचा समाचार घेतला. महाराष्ट्रात यापेक्षा कितीतरी मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत आधी ते सोडवा अशा प्रतिक्रीया नेटकर्यांनी दिल्या आहेत.

    काय म्हणाल्या विजया रहाटकर?

    जेव्हा आपल्या स्वतःच्या पक्षाचे आमदार, महापौर, त्यांची मुलं यांनी नियमांचे उल्लंघन करून लस घेतली त्यावेळी आपण त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले .परंतु देवेंद्र फडणवीस जी यांच्या एका दूरच्या नातेवाईकांने लस काय घेतली तुम्ही तर चक्क नियम आणि प्रोटोकॉल दाखवत आहात.
    कुणीतरी म्हण्टले आहेच ‘ याला म्हणतात डबल स्टँडर्डिटिस!

    हिंदी मे कहते है , ‘सौ चुहें खाकर …

    यासोबतच त्यांनी एका बातमीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये नियमांचे उल्लंघन करून शिवसेनेचे ठाणे महापौर नरेश म्हस्के ह्यांनी लस घेतल्याचे दाखवण्यात आले आहे.

    काय आहे प्रकरण?

    कायदा आपले काम करू शकतो. आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत. आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा, असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले.
    तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की नियमांनुसार पात्र नसल्याने माझ्या पत्नीला आणि मुलीलाही लस देण्यात आली नाही. यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ असे म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्याला उत्तर देताना भाजपाच्या विजया रहाटकर यांनी देखील ट्विट करत प्रियंका चतुर्वेदीला आरसा दाखवून दिला आहे.

    Face to face : BJP’s Vijaya Rahatkar shows mirror to Shiv Sena’s Priyanka Chaturvedi who taught Devendra Fadnavis rules on vaccine issue

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!